Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकमध्ये होणारा 'तो' प्रकल्प पुण्यात; भुजबळांच्या तारांकित प्रश्नावर सामंतांचे उत्तर

नाशिकमध्ये होणारा ‘तो’ प्रकल्प पुण्यात; भुजबळांच्या तारांकित प्रश्नावर सामंतांचे उत्तर

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याचे उद्योगमंत्र्यांनी नाशिकमध्ये सुमारे १० हजार कोटी रुपयांचा महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी इलेक्ट्रिक व्हेईकल होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली होती…

- Advertisement -

मात्र आता नाशिकमध्ये होणारा महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी इलेक्ट्रिक व्हेईकल प्रकल्प पुण्यात होणार असल्याची माहिती राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी लेखी उत्तरात दिली आहे.

छगन भुजबळ यांनी सभागृहात दाओस येथे जागतिक आर्थिक परिषदेत शासनाने केलेल्या सामंजस्य कराराबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्या प्रश्नात त्यांनी म्हटले आहे की, दाओस येथील जागतिक आर्थिक परिषदेत शासनाने जगभरातील विविध कंपन्यांसोबत १.३७ लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले असल्याचा दावा राज्य शासनाने माहे जानेवारी, २०२३ मध्ये वा त्यादरम्यान केला.

त्यामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी इलेक्ट्रिक व्हेईकल क्षेत्रामध्ये दहा हजार कोटींची गुंतवणूक करणान्या प्रकल्पाचा विस्तार नाशिकमध्ये होणार असल्याचे राज्य शासनाने अधिकृतरित्या जाहिर केले परंतु हा विस्तार नाशिक ऐवजी अहमदनगर येथे होणार आहे का ? सदर परिषदेत राज्य शासनाने करार केलेल्या अनेक कंपन्या देशात व राज्यात नोंदणीकृत असताना सदरील कंपन्यांसोबत दाओस येथे जाऊन करार करण्यासंदर्भातील कारणे काय आहेत.

तसेच, गडचिरोली जिल्हयाच्या चार्मोशीजवळील कोनसरीमध्ये स्टील प्लांट उभारण्यासाठी दाओस येथे वरद फेरो अलॉय प्रा. लिमिटेड या कंपनीशी सामंजस्य करार करण्यात आला परंतु या कंपनीकडे स्वत:ची लोह खनिजाची खाण व पुरेसे भांडवल नसतानाही हा करार करण्यात आला. नविन उद्योग राज्यात येण्यासाठी द्यावयाच्या सवलती, विविध परवानग्या तसेच यातून रोजगार निर्मिती व स्थानिकांना प्राधान्य देण्यासंदर्भात तसेच उद्योगस्नेही धोरण अवलंबिण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे अशी विचारणा केली.

Assembly Election 2023 Results : त्रिपुरा, मेघालय, नागालँडमध्ये कुणाचे वर्चस्व?; जाणून घ्या सविस्तर

त्यावर लेखी उत्तरात मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे की, दाओस येथील जागतिक आर्थिक परिषदेत शासनाने जगभरातील विविध कंपन्यांसोबत १.३७ लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार करण्यात आले आहे. यामध्ये नाशिक येथे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी इलेक्ट्रिक व्हेईकल प्रकल्प होणार नाही. तसेच तो अहमदनगर येथेही स्थलांतरीत करण्यात आलेला नाही. तर महिंद्र इलेक्ट्रीक व्हेईकल ऑटोमोबाईल लि. घटक हा सनराईज सेक्टरमधील असून, इलेक्ट्रीक व्हेईकल निर्मिती हा उच्च तंत्रज्ञानावर आधारित या क्षेत्रातील प्रकल्प आहे. देशांतर्गत इलेक्ट्रीक व्हेईकलमध्ये रु.१०,००० कोटींची गुंतवणुक असणारा हा पहिलाचा प्रकल्प असून, सदर प्रकल्प पुणे येथे स्थापित होणारा नविन प्रकल्प आहे अशी माहिती त्यांनी उत्तरात दिली आहे.

तसेच भारतामध्ये गुंतवणुक करण्याकरीता संबंधित कंपनी देशामध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. दावोस येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ / राज्य शासनाशी सामंजस्य करार केलेल्या कंपन्या देशात / राज्यात नोंदणीकृत असल्या तरीही त्यांच्या एकूण गुंतवणुकीमध्ये थेट विदेशी गुंतवणुकीचा हिस्सा असल्यामुळे सदर कंपन्यांसोबत दावोस येथे सामंजस्य करार करण्यात आले आहेत.

चिंचवडचा गड भाजपने राखला; अश्विनी जगताप यांचा मोठ्या मताधिक्याने विजय

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील भूखंड वाटप समिती तपशीलवार प्रकल्प अहवालानुसार (Detailed Project Report),प्रकल्पाशी संबंधित आवश्यक सर्व बाबी तपासूनच भूखंड वाटपाबाबत निर्णय घेते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

कसबा पोटनिवडणुकीत चर्चेत असलेल्या बिचुकले आणि दवे यांना किती मतं पडली?

महाराष्ट्रामध्ये असलेले उद्योग पुरक वातावरण, अद्यावत औद्योगिक पायाभूत सुविधा, प्रगत आद्योगिक धोरण, सामुहिक प्रोत्साहन योजना, क्षेत्र निहाय विशेष औद्योगिक धोरणे तसेच EoDB (Ease of Doing Business) अंतर्गत मोठया गुंतवणुकदारांना मार्गदर्शन तसेच गुंतवणुकीबाबत सर्वोतोपरी सहाय्य करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले रिलेशनशीप मॅनेजरर्स व रिलेशनशीप एक्झीक्युटीव्ह तसेच प्रमुख विदेशी गुंतवणुकदारांना सहाय्य करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले समर्पित विदेश कक्ष, एक खिडकी योजना इत्यादींमुळे नविन उद्योग राज्यात येण्यासाठी राज्यात गुंतवणुकस्नेही वातावरण तयार झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या