Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याआई चेंडू आणायला निघाली तेवढ्यातच गॅलरीतून पडून चिमुकल्याचा मृत्यू

आई चेंडू आणायला निघाली तेवढ्यातच गॅलरीतून पडून चिमुकल्याचा मृत्यू

नाशिक | दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून खाली पडल्याने दाेन वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना गंगापूर रोडवरील शिवाजी नगर परिसरात घडली.

गौरव शरद शेवाळे असे या चिमुकल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव बुधवारी (दि.२९) घरात क्रिकेट खेळत होता.

- Advertisement -

खेळताना चेंडू खाली पडला. त्यामुळे गौरव याची आई चेंडू आणण्यासाठी खाली गेली. तर गौरव गॅलरीतून खाली पाहत होता.

त्याचवेळी तोल गेल्याने गाैरव बाल्कनीतून खाली पडला. त्याला गंभीर मार लागल्याने त्यास तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या