ई-बाईकने घेतला अचानक पेट; पार्किंगमधील इतर गाड्यांचेही मोठे नुकसान

ई-बाईकने घेतला अचानक पेट; पार्किंगमधील इतर गाड्यांचेही मोठे नुकसान

इंदिरानगर | वार्ताहर | Indiranagar

प्रशांतनगर (Prashantnagar) येथे असलेल्या सर्वे नंबर 297 मधील मल्हार बिल्डिंगच्या तळमजल्यावर उभ्या असलेल्या इलेक्ट्रिक गाडीला (Electric Vehicle) आज (17) सकाळी आग (Fire) लागल्याची घटना घडली....

या आगीत आजूबाजूच्या इतर गाड्यांनी पेट घेतला. आगीत आठ गाड्या जळून खाक झाल्या आहे. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गाडीला आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्या गाडीतील बॅटरीमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

रस्त्यावरून जात असलेल्या काही युवकांच्या आग लागल्याचे लक्षात आल्याने त्यांनी अग्निशमन दल (Fire Brigade) व पोलीस स्टेशनला (Police Station) माहिती दिली. तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात पसरली होती.

रहिवाशांना ही बाब लक्षात येताच त्यांनी खाली उतरण्याचा प्रयत्न केला. आग व धुरामुळे ते कसेबसे खाली आले. त्यांनी पाण्याच्या टाकीमधून पाणी काढून आग विझविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला.

ई-बाईकने घेतला अचानक पेट; पार्किंगमधील इतर गाड्यांचेही मोठे नुकसान
Visual Story : आसाममध्ये हाहाकार; अंगाचा थरकाप उडवणारे फोटो आले समोर

तोनंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी येऊनही त्यांनी ही आग विझवली. इंदिरानगर पोलीस स्टेशनचे एपीआय निसार सय्यद तसेच पोलीस कॉन्स्टेबल शेख, दीपक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

यात सुमारे दोन लाख साठ हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com