दोन पीडित महिलांची पोलिसांनी केली सुटका

दोन पीडित महिलांची पोलिसांनी केली सुटका

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

स्वतःच्या फायद्या साठी दोन महिलांकडुन अनैतिक देह व्यापार चालवणाऱ्या एकास अटक करून अंबड पोलिसांनीदोघा पीडित महिलांची सुटक केली आहे . या प्रकरणी अंबड पोलिसांनी ( Ambad Police Station )गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

याबाबत अंबड पोलिसांनी सांगितले की उत्तम नगर जवळील बुरकुले हॉलच्या पाठीमागील बाजूस एका रो हाऊस मध्ये संशयित धनंजय मोरे हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून दोन महिलांच्या माध्यमातुन अनैतिक देह विक्री करण्याचा धंदा चालवत होता.

याबाबत अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख व यांना याबाबतची माहिती मिळावी यानंतर पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक किशोर कोल्हे, उपनिरीक्षक संदिप पवार व पोलीस कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी छापा टाकला.

यावेळी पोलिसांनी दोघा पीडित महिलांची सुटका करून देहविक्री व्यापार करणाऱ्या संशयित धनंजय मोरे यास याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे .

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com