भुसावळात खंडणीसाठी दोन व्यापार्‍यांना धमकी

भुसावळात खंडणीसाठी दोन व्यापार्‍यांना धमकी

भाई से बात करो, बिस हजार रूपये लगेंगे नही तो, दुकान चलेंग नही; व्यापार्‍यांमध्ये दहशत

भुसावळ Bhusawal । प्रतिनिधी

‘मर्डर, हाफ मर्डर वाले है हम, भाई आज भुसावल कोर्ट मे तारिख पे आ रहा है, उनको खर्चे को पैसे लगेंगे’ असे म्हणत फोन (phone)वरून व प्रत्यक्ष (directly in front) समोर दोन तरूणांनी (Two young men) भुसावळ येथील दोन व्यापार्‍यांना (traders) खंडणीसाठी (extortion) धमकावल्याची (threatened) घटना आज (दि.16) रोजी दुपारी 1.25 वाजेच्या सुमारास घडली. सदर घटनेने भयभीत झालेल्या व्यापार्‍यांनी त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून शहर पोलिस ठाणे गाठले व हकिकत सांगितली. शहर पोलिस ठाण्यात दोन अज्ञात तरूणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळात खंडणीसाठी दोन व्यापार्‍यांना धमकी
VISUAL STORY : सौंदर्याला वय असते की वयाला सौदर्य ? चक्रावलात ना ! मग या 42 वर्षीय अभिनेत्रीच्या अदा पाहाच...
भुसावळात खंडणीसाठी दोन व्यापार्‍यांना धमकी
बालविवाहाला प्रतिबंध करायचायं... तर मग हा चाईल्ड हेल्पलाईन नंबर लक्षात ठेवा

याबाबत मिळालेली माहिती अशी की, यावल रोड वरील नगरपरिषद दवाखान्यासमोर असलेल्या गुजराथी स्वीट मार्टमध्ये संचालक कपिल शशिकांत मेहता हे नेहमीप्रमाणे दुकानात ग्राहक सांभाळत असतांना दुपारी 1.25 च्या सुमारास दुचाकी वाहनावरून 25 ते 30 वर्षीय दोन तरूण तोंडाला (ओळख पटणार नाही असे) कापड गुंढाळून दुकानात शिरले.

त्यांनी साध्या फोन वरून त्यांच्या आका (भाई)ला फोन लावला व भाई इससे बात करो असे सांगुन कपिल मेहता यांना फोन दिला समोरची व्यक्ती फोन वर सांगत होती ‘मर्डर केस के आरोपी कोर्ट मे आ रहे है, लडको को खर्चापाणी लगेंगा, तु 20 हजार रूपये दे’ इकडून कपिल ने सांगितले पैसे आताच बँकेत भरले, कामावरचा मुलगा आल्यावर बघतो. तीन चार वेळा हा फोन झाला.

दरम्यान फोन देणार्‍या सोबत आलेला दुसरा तरूण ‘पैसे तो तेरे को देनेही पडेंगे नही तो दुकान नही चलेंगी समझ ले’ अशी धमकी देत होता.

भुसावळात खंडणीसाठी दोन व्यापार्‍यांना धमकी
धुळे-सुरत महामार्गावर ३१ लाखांचा दारुसाठा असलेला कंटेनर जप्त
भुसावळात खंडणीसाठी दोन व्यापार्‍यांना धमकी
मेहरगाव फाट्यावर अपघात : 21 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

असाच प्रकार मॉर्डन रोड, गांधी चौकाच्या पुढे असलेल्या गोपी शॉपिंग मॉलच्या मालका सोबतही झाला. हेच तरूण या दुकानात शिरले व याच प्रकारे धमकावू लागले मात्र त्यांना कुणीही दमडी दिली नाही.

दरम्यान भुसावळ शहर व्यापारी संघटनेचे पदाधिकारी पिंटू कोठारी, नितीन सुराणा, शाम दरगड, विजय मोनानी, अजय नागराणी, विशाल अग्रवाल, मंगेश यावलकर, अर्थव पांडे, महेश टाक व इतर व्यापार्‍यांनी शहर पोलिसांनी ही माहिती दिली.

भुसावळात खंडणीसाठी दोन व्यापार्‍यांना धमकी
पारोळा बाजार समिती सभापती पदी डॉ. सतीश पाटील बिनविरोध

त्यानुसार शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून व्यापारी मात्र सदर घटनेने भयभीत झाले आहे. पोलिसांनी संशयीतांच्या तपासासाठी सीसी फुटेज तपासून पथक रवाना केले आहे.

पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती घेवून तपासाबाबत सुचना केल्या आहेत. सदर घटनेच्या मागे एका प्रख्यात व्यक्तीच्या खुनाचे लागेबांधे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे..

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com