
नवी दिल्ली | New Delhi
गेल्या आठवड्यात पुलवामा (Pulwama) येथे दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित संजय शर्मा (Kashmiri Pandit Sanjay Sharma) यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केली होती. संजय शर्मा हे बाजारात जात असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. गोळ्या झाडल्यानंतर दहशतवाद्यांनी घटनास्थळावरून पळ काढला होता.
त्यानंतर संजय शर्मा यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे वैदकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले होते. या हत्येनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. दहशतवाद्यांना (Terrorists) पकडण्यासाठी सुरक्षा दलांने तातडीने शोधमोहीम सुरू करत नाकेबंदी केली होती.
त्यानंतर आज या हत्येत सहभागी असणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे वृत्त हाती आले असून जम्मू काश्मीरच्या अवंतीपोरामध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.
दरम्यान, या चमकीमध्ये सुरक्षा दलाच्या (security forces) जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या खात्मा झालेल्या दहशतवाद्यांमध्ये पंडित संजय शर्मा यांची हत्या करणाऱ्याचा देखील समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.