Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याविषबाधा झाल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू; दोन गंभीर

विषबाधा झाल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू; दोन गंभीर

इगतपुरी | Igatpuri | प्रतिनिधी

तालुक्यातील मतिमंद (Mentally) आश्रमशाळेत उलट्या होऊन दोन विद्यार्थ्यांच्या (Students) मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर दोन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात (Hospital) उपचार सुरु आहेत. अन्नातून किंवा पाण्यातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील अनुसयात्मजा मतिमंद निवासी विद्यालय, इंदिरा भारती कारण बधीर निवासी विद्यालय, रखमाबाई अपंग युवक स्वयंसहायता केंद्र असे मतिमंद विद्यालय चालवणाऱ्या संस्थां आहे.

या विद्यालयात १२० विद्यार्थी असुन मंगळवारी रात्री खिचडीचे जेवन केल्यावर बुधवारी पहाटेच्या सुमारास यातील ८ विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास सुरु झाला. यामुळे या विद्यार्थ्यांना इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात (Igatpuri Rural Hospital ) उपचारासाठी दाखल केले असता यात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यु झाला. तर दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवले असून चार विद्यार्थ्यांवर येथे उपचार सुरू आहेत. काल पहाटे पासून विद्यार्थ्यांना त्रास सुरू होता.

या घटनेत हर्षल गणेश भोईर (२३) (Harshal Ganesh Bhoir) रा. भिवंडी, जि. ठाणे व मोहम्मद जुबेर शेख (११ ) (Mohammed Zubair Shaikh) रा. नाशिक या दोन जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. तर प्रथमेश निलेश बुवा, वय १७ व देवेंद्र कुरुंगे वय १५ वर्ष या दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नाशिकला (Nashik) पाठवण्यात आले आहे. तर उर्वरित मुलांची तपासणी सुरू केली आहे.

तसेच या विद्यार्थ्यांनी खालेल्या अन्नाचे नमुने जमा केले असून या घटनेत मृत झालेल्या विद्यार्थ्यांचा मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात (District Hospital Nashik) पाठविले आहेत.

यावेळी ग्रामीण रुग्णालयात पोलीस उपअधिक्षक अर्जुन भोसले (Arjun Bhosale) पोलीस, निरीक्षक वसंत पथवे, सहायक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे, मुख्याधिकारी पंकज गोसावी (Pankaj Gosavi) नायब तहसीलदार प्रविण गुंडाळे, आरोग्य निरीक्षक यशवंत ताठे यांच्यासह शहरातील विविध पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, या घटनेबद्दल इगतपुरी – त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर (MLA Hiraman Khoskar) यांनी पावसाळी अधिवेशनात आवाज उठवला असून घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या