मालेगावमधून पुन्हा PFI संबंधित दोघांना अटक

मालेगावमधून पुन्हा PFI संबंधित दोघांना अटक

मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon

वादग्रस्त ठरलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेशी संबंधित व पुर्वाश्रमीचा जिल्हाध्यक्ष असलेल्या मौलाना इरफान दौलत नदवी याच्यासह जमाते इस्लामीचा पदाधिकारी असलेला सादील एकबाल अन्सारी या दोघांना आज पहाटे नाशिक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी घरातून ताब्यात घेत अटक (Arrested) केली. शहरात कायदा-सुव्यवस्था तसेच शांततेच्या दृष्टीकोनातून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले...

राष्ट्रीय तपास यंत्रणेने गुरूवार, दि. 22 सप्टेंबर रोजी संपुर्ण देशभरात छापे टाकून पीएफआयच्या पदाधिकार्‍यांना ताब्यात घेतले होते. या कारवाईत पीएफआयचा जिल्हाध्यक्ष असलेल्या मौलाना सैफुर रहेमान सईद अहमद अन्सारी याला हुडको कॉलनीतील घरातून एनआयए पथकाने पहाटेच्या सुमारास छापा मारून अटक केली होती.

मालेगावमधून पुन्हा PFI संबंधित दोघांना अटक
नदीत बुडालेल्या 'त्या' तरुणाचा मृतदेह अखेर सापडला

यावेळी मौलानाच्या घरातून आक्षेपार्ह साहित्य देखील जप्त केले गेले होते. या कारवाईनंतर शहराकडे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाव्दारे लक्ष केंद्रीत करण्यात आले होते.

मालेगावमधून पुन्हा PFI संबंधित दोघांना अटक
काहीशा उघडीपीनंतर 'तो' पुन्हा येणार

आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास पीएफआयचा पुर्वीचा जिल्हाध्यक्ष असलेला मौलाना इरफान दौलत नदवी यास मदनीनगर भागातील त्याच्या घरातून तर जमाते इस्लामीचा पदाधिकारी असलेला सादील एकबाल अन्सारी यास इस्लामपुरा भागातील त्याच्या घरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापे मारून ताब्यात घेत अटक केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com