सिन्नर-शिर्डी महामार्गावर अपघात; दोघांचा मृत्यू

सिन्नर-शिर्डी महामार्गावर अपघात; दोघांचा मृत्यू

वावी | वार्ताहर | Vavi

येथील सिन्नर-शिर्डी महामार्गावरील (Sinner-Shirdi highway) फुलेनगर फाट्याजवळील पेट्रोल पंपावर दुचाकीला इनोव्हा कारने जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, फुलेनगर फाट्यावर असलेल्या पेट्रोल पंपावर (Petrol Pump) दुचाकीमध्ये पेट्रोल भरून दोघे फुलेनगरकडे जाण्यासाठी शर्वरी लॉन्स समोरील रस्ता ओलांडत असतांना सिन्नरवरून शिर्डीच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या इनोव्हा कार क्रमांक एम.एच. ०८ ए.एम ३३८३ हिने दुचाकी क्रमांक एम.एच. १५ एच.व्ही ७०८१ हिस जोरदार धडक दिल्याने मोटरसायकलवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, या अपघातात वैभव अशोक कुलकर्णी (३८) व सुवर्णा अशोक कुलकर्णी (७०) रा. पंचवटी या मायलेकांचा मृत्यू झाला असून त्यांचे मूळ गाव वावी असल्याचे समजते. तसेच या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते (Sagar Kote) यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह.दशरथ मोरे व नितीन जगताप करत आहे

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com