Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यामोठी दुर्घटना! बांके बिहार मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, अनेक जखमी

मोठी दुर्घटना! बांके बिहार मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, अनेक जखमी

नवी दिल्ली | New Delhi

जन्माष्टमीच्या दिवशी संपूर्ण देश भगवान श्रीकृष्णाच्या (Lord Krishna) पूजेत मग्न असतानाच उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मथुरेतील (Mathura) ठाकूर ‘बांके बिहार’मंदिरात (Banke Bihar Temple) चेंगराचेंगरी (Stampede) झाल्याची घटना घडली आहे…

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या चेंगराचेंगरीत २ भाविकांचा मृत्यू (Death) झाला असून अनेक भाविक (Devotee) जखमी झाले आहेत. तसेच जखमींवर रुग्णालयात (Hospital) उपचार सुरु आहेत. मंदिरातील प्रसिद्ध मंगला आरतीदरम्यान ही घटना घडली. जगभरात ही आरती प्रसिद्ध आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक आरतीसाठी उपस्थित होते.

दरम्यान, जन्माष्टमीला वर्षातून एकाच दिवशी मंगला आरती होत असल्याने याठिकाणी भाविकांची मोठी वर्दळ असते. याच गर्दीमध्ये (crowd) गुदमरल्याने ही दुर्घटना घडली.

- Advertisment -

ताज्या बातम्या