इमारतीचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू; ३ गंभीर

इमारतीचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू; ३ गंभीर

मुंबई | Mumbai

येथील उल्हासनगर परिसरातील (Ulhasnagar Area) कॅम्प क्रमांक पाच मध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून (Slab collapse) दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे...

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर भागातील मानस टॉवर (Manas Tower) नावाची चार मजली इमारत असून या इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. या घटनेत २ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच या ठिकाणी ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, स्लॅब कोसळल्याची माहिती मिळताच, पालिका प्रशासनासह (Municipal Administration) अग्निशामक दलाच्या (Fire Brigade) कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com