
सिन्नर | अमोल निरगुडे | Sinner
शिर्डी ते भरवीर (Shirdi to bharvir) या समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Highway) दुसऱ्या टप्प्यात अपघाताची (Accident) मालिका सुरूच असून आज (दि.३) रात्री १ वाजेच्या सुमारास मुंबईकडून शिर्डीकडे (Mumbai to Shirdi) जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट दुसऱ्या लेनवर पलट्या घेत गेल्याने दोघांचा मृत्यू (Death) तर अन्य दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत...
नव्याने झालेला हा महामार्ग वाहनधारकांना एकप्रकारे संमोहित करत असून सुनसान वाटणाऱ्या रस्त्याने प्रवास करताना वाहनधारकांचे नियंत्रण सूटत असल्याचे बोलले जात आहे. समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली असली तरी अद्याप वाहनधारकांना महामार्गावरून वाहने चालवण्याचा अंदाज येत नसल्याने अपघातात वाढ झाली आहे. वाहनधारक सुसाट वेगाने महामार्गावरुन जात असल्याने एकतर चालकाचे नियंत्रण सुटून किंवा वाहनाचे टायर फुटून अपघात होत आहेत. एकप्रकारे हा महमार्ग वाहनधारकांना संमोहित करत असून सुनसान असणारा हा रस्ता अपघातास कारणीभूत ठरत आहे.
आज (दि.३) रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास मुंबईकडून शिर्डी बाजूकडे जाणारी कार क्र. एम. एच. २० ई. वाय. ५२५७ ही सिन्नर तालुक्यातील (Sinner Taluka) पूर्व भागातून जात असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरवर आदळून शिर्डी बाजूकडून थेट मुंबई बाजूकडे जाणा-या लेनवर जाऊन आदळली. यावेळी कारने (Car) दोन ते तीन पलटी घेतल्याने कारचा चेंदामेंदा झाला. या अपघातात भरतसिंग परदेशी, नंदीणी (पुर्ण नाव समजून आले नाही) हे दोघे गंभीर जखमी झाले असून धरमसिंग गुसींगे, राजेंद्र राजपूत या दोघांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, अपघाताची महिती कळताच महामार्गावरील रेस्क्यू पथक व महामार्ग पोलिसांनी (Police) तात्काळ घटनास्थळी पोहचत मदतकार्य सुरू केले. जखमींना ॲम्ब्युलन्सने कोपरगाव येथे औषधोपचारासाठी पाठविण्यात आले. अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या कडेला घेवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक शशिकांत गिरी, सिन्नर महामार्ग पोलीस केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. डी. गायकवाड यांच्यासह महामार्गाचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक, क्यू. आर. व्ही व्हॅन वाहनावरील कर्मचारी यांनी मदतकार्य केले.