शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीलाही खिंडार?

शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीलाही खिंडार?

नवी दिल्ली । New Delhi

महाराष्ट्रात (Maharashtra) सत्तांतरानंतर आता पक्षांतराचे वारे वाहू लागले असून भाजपकडून (BJP) काँग्रेस (Congress) राष्ट्रवादीसह (NCP) शिवसेनेच्या (Shivsena) स्थानिक नेते, माजी आमदार,पदाधिकारी यांना गळाला लावण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. यातील पहिल्या प्रयत्नात भाजपला यश येण्याची शक्यता असून सोलापुरात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे...

सोलापुरातील (Solapur) माढा मतदारसंघाचे (Madha Constituency) राष्ट्रवादीचे (NCP) आमदार बबनराव शिंदे ( MLA Babanrao Shinde) आणि माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil ) यांनी दिल्लीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांची भेट घेतली असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला सोलापुरात मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष (NCP President) शरद पवार (Sharad Pawar) यांनी सोलापुरातील मोहोळचे (Mohol) माजी आमदार राजन पाटील यांच्यासाठी बैठक घेतली होती. त्याच्या दोन दिवसानंतर राजन पाटील दिल्लीला गेल्याने अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com