Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यामनपा स्थायी समितीच्या आज दोन सभा

मनपा स्थायी समितीच्या आज दोन सभा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगरपालिका स्थायी समिती (Nashik Municipal Corporation Standing Committee ) सभापतीसह सदस्यांची मुदत आज दिनांक 28 फेब्रुवारी रोजी संपत आहे. यामुळे आज सकाळी एक व दुपारनंतर एक अशा दोन स्थायी समितीच्या सभा आयोजित करण्यात आले आहे. विकासकामांना चालना मिळावी तसेच सर्व इतिवृत्त मंजूर व्हावे, यासाठी दुसरी स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. 1 फेब्रुवारी रोजी प्रभाग रचना जाहीर करून 14 फेब्रुवारी पर्यंत त्याच्यावर हरकती मागविण्यात आल्या होत्या, तर 23 फेब्रुवारी रोजी त्याच्यावर राज्य निवडणूक आयोगाच्या विशेष अधिकारी यांनी सुनावणी घेतली. दोन मार्च रोजी अंतिम अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे जाणार आहे. दरम्यान नाशिक महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडली आहे.

स्थायी समितीची मुदत 28 फेब्रुवारी रोजी संपणार आहे, त्याचप्रमाणे महापौर तसेच सर्व नगरसेवकांची मुदत दोन आठवड्यानंतर म्हणजेच 14 मार्च 2022 रोजी संपणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका प्रशासन सतर्क झाले असून वेळप्रसंगी शासनाकडे मार्गदर्शन देखील मागविल्या जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान कोट्यवधी रुपयांची विकासकामे शहरात सुरू असून कोट्यवधींची कामे प्रलंबित देखील आहे. ही कामे मार्गी लागावी तसेच वेळेत त्याचे टेंडरिंग व्हावे, यासाठी स्थायी समिती सभापती गणेश गिते व सदस्य प्रयत्नशील आहे. यामुळेच उद्या दोन सभा होणार आहे. यानंतर स्थायी समितीच्या कार्यकाळ संपणार आहे. दरम्यान सभापती गणेश गिते सलग 2 वर्ष सभापती आहे, त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात विकास झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या