नाशकात दोन बिबट्यांचा थरार; एक जेरबंद, एकाचे रेस्क्यू सुरु

नाशकात दोन बिबट्यांचा थरार; एक जेरबंद, एकाचे रेस्क्यू सुरु

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशकात आज सकाळपासून दोन बिबट्यांचा थरार रंगला आहे. पहिला बिबट्या हा सावतानगर परिसरातील विठ्ठल मंदिराजवळ दिसला. तर दुसरा बिबट्या अशोक प्राइड बिल्डिंग गोविंदनगर येथे आढळला. बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे...

पोलिसांसह वनविभागाचे पथक बिबट्याला पकडण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. दोन तासांच्या अथक प्रयत्नाअंती सावतानगर येथील बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले आहे.

मात्र गोविंदनगर येथील बिबट्याचे रेस्क्यू अजूनही सुरु आहे. गोविंदनगर येथे आढळलेल्या बिबट्याने एकावर हल्ला केल्याचे समजते. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग अथक प्रयत्न करत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com