IPL मध्ये कोरोनाचा शिरकाव : आजचा सामना रद्द ?

IPL मध्ये कोरोनाचा शिरकाव : आजचा सामना रद्द ?

नवी दिल्ली:

कोरोना आता थेट इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये पोहचला आहे. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) टीमशी संबंधित काही सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे आयपीएल स्पर्धेतील आजचा सामना रद्द करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केकेआरचे दोन खेळाडू हे कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने आता थेट सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकारे मॅच रद्द झाल्यास ही आयपीएलच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे.

KKR आणि RCB यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना होणार आहे. RCBची टीम सध्या पॉईंट टेबलवर तिसऱ्या क्रमांकावर असून KKRची टीम सातव्या क्रमांकावर आहे. KKR टीममधील कोणत्या सदस्याला कोरोनाची लागण झाली याची माहिती मिळाली नाही.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com