नाशिकमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांचा राडा; पत्रकारांना मारहाण

नाशिकमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांचा राडा; पत्रकारांना मारहाण

नाशिक | Nashik

सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) लावणी सम्राट गौतमी पाटील (Gautami Patil) तरुणाईच्या पंसतीस उतरली असून तिचा ज्या ठिकाणी कार्यक्रम असतो तिथे वाद आणि गोंधळ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच काल नाशिकमध्ये (Nashik) आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात तरुणांनी हुल्लडबाजी करत दोन पत्रकारांना मारहाण (Beating journalists) केल्याची घटना घडली आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकमधील नवनिर्माण सेवाभावी संस्थेच्या वतीने रुग्णवाहिकेसाठी निधी जमवण्यासाठी गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम त्र्यंबकरोडवरील ठक्कर डोम येथे आयोजित करण्यात आला होता. तब्बल दोन तास उशिरा सुरू झालेल्या या कार्यक्रमात प्रेक्षक मर्यादित होते. मात्र सर्वच प्रेक्षक स्टेजजवळ जमा झाल्याने एकच गर्दी झाली होती.

नाशिकमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांचा राडा; पत्रकारांना मारहाण
Mumbai Fire : मुंबईत झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल

त्यावेळी हुल्लडबाजी करणाऱ्या काही तरुणांनी (Youth) कार्यक्रमात राडा घालण्यास सुरूवात केली. त्यावेळी तेथे उपस्थित असलेले काही पत्रकार आणि पोलीस या तरुणांची समजूत काढण्यासाठी गेले असता या तरुणांनी थेट पत्रकारांना मारहाण केली. या मारहाणीत पत्रकार गंभीर जखमी झाले असून त्यांना मुका मार लागला आहे. तसेच या दोन्ही पत्रकारांवर सध्या उपचार सुरू असून याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे

दरम्यान, या घटनेसाठी सर्वस्वी गौतमी पाटीलला जबाबदार धरून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच नाशिकमध्ये असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी नाशिक जिल्ह्यात गौतमी पाटीलला पूर्णतः बंदी घालण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (Nationalist Youth Congress) वतीने करण्यात आली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com