Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यादेवळा-कळवण रस्त्यावर भीषण अपघात; दोघा दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू

देवळा-कळवण रस्त्यावर भीषण अपघात; दोघा दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू

देवळा/मटाने/वाजगाव | वार्ताहर

देवळा-कळवण रस्त्यावर दोन दुचाकींचा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. आज (दि २७) सायंकाळी तालुक्यातील मटाने गावाजवळ ही दुर्घटना घडली….

- Advertisement -

देवळा कळवण रस्त्यावर मटाने गावाजवळ केदारे वस्ती आहे. या वस्तीच्या समोरच खड्डे टाळण्याच्या नादात दोन दुचाकी अनियंत्रित झाल्यामुळे समोरासमोर एकमेकांवर आदळल्या.

या अपघातात औरंगाबाद व उमराणे येथील दुचाकीस्वार जागीच ठार झाले. नानाजी कारभारी देवरे (वय 58) सागर उकले(वय 40, रा. वैजापूर) असे दोघा मयतांची नावे आहेत. मयत नानाजी देवरे वनखात्यातून आठवड्याभरापूर्वीच निवृत्त झाले होते. उमराण्याहून कळवण येथे ते चेक आणण्यासाठी गेलेले होते अशी माहिती समजते आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या