Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यामोहदरी घाटात अपघात; दोघांचा मृत्यू, दोघे जखमी

मोहदरी घाटात अपघात; दोघांचा मृत्यू, दोघे जखमी

नाशिक/सिन्नर | प्रतिनिधी Nashik/Sinnar

सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) मोहदरी घाटात (Mohadari Ghaat) स्विफ्ट कारच्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. (Two dies in an accident in mohadari ghat sinnar) अपघाताची नोंद सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे….

- Advertisement -

रणबीरच्या प्रश्नावर आलिया का लाजली?

अधिक माहिती अशी की, रात्री सिन्नर-नाशिक महामार्गावरील (Sinnar Nashik Highway) मोहदरी घाटातून नाशिककडे जाणारी स्विफ्ट कार (एम.एच.१३ एएफ ९४४१) व अज्ञात वाहनाचा अपघात झाला. या अपघातात स्विफ्ट कार मधील गणेश बालाजी एखंडे (वय ३२) रा. पळसे, दशरथ राजाराम कासार (वय ४२) रा. शेवगे दारणा यांचा जागीच मृत्यू झाला.

Photo कोण आहे मिस युनिव्हर्स झालेली हरनाज संधू

तर सुधाकर शिवाजी कासार (वय ४५) गंभीर जखमी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघातातील शशी अरुण गायधनी (वय ३३) हे किरकोळ जखमी असून त्यांना नाशिकरोड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या फोटोंनी सोनाली कुलकर्णीचे खुललं सौंदर्य

अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलीस निरिक्षक तुषार गरुड (API Tushar Garud) व पथकाने अपघात स्थळी धाव घेतली. सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Sinnar MIDC Police Station) नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या