
मुंबई | Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते लोकार्पण झालेल्या समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Highway) अपघात दिवसेंदिवस वाढतच आहेत. काही दिवसांपूर्वी विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात (Accident) होऊन २६ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. अशातच आता अमरावती जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे...
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रात्री एक वाजेच्या सुमारास ट्रक चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात असून या अपघातात चालकासह एकाचा मृत्यू झाला आहे. हा ट्रक नागपूरहून मुंबईकडे (Nagpur to Mumbai) जात होता. त्यावेळी रात्री एक वाजेच्या सुमारास चालकाला डुलकी लागल्याने ट्रक (Truck) पुलाच्या सिमेंट कठड्यावर जाऊन आदळला.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच तळेगाव दशासर येथील पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अपघाताचा पुढील तपास सुरु केला आहे. तसेच हा अपघात इतका भीषण होता की, अपघातात ट्रकच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे.