जिल्ह्यात डेल्टा प्लसचा शिरकाव

जिल्ह्यात डेल्टा प्लसचा शिरकाव

नाशिक | Nashik

जिल्ह्यात दोन रुग्णामध्ये डेल्टा प्लस (Delta Plus) प्रकार आढळून आला आहे. मात्र, हे दोन्ही रुग्ण एप्रिल महिन्यात कोरोनाबाधित होते. तसेच त्यांचा अहवाल आज रात्री प्राप्त झाला...

जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ. अशोक थोरात (Dr. Ashok Thorat) यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) ठाणगाव (Thangaon) व नाशिक शहरातील (Nashik City) एक बाधिताच्या नमुन्यात डेल्टा प्लस आढळून आला. हे दोन्ही रुग्ण एप्रिल महिन्यात बाधित होते.

रात्री उशिरा अहवाल प्राप्त झाल्याने आरोग्य विभागाकडून दोन्ही रुग्णाची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात दोघांची तब्बेत, त्यांना काही त्रास आहे का याची शहानिशा करण्यात येणार आहे. दोन्ही अहवाल जुन्या नमुन्यामधील असल्याने सध्यातरी जिल्ह्यास कोणताही धोका नसल्याचे बोलले जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com