जिजाऊ ब्रिगेडचे दोन दिवसीय विभागीय महा अधिवेशन कोल्हापुरात

न्यूज अपडेट/News Update
न्यूज अपडेट/News Updateन्यूज अपडेट/News Update

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

मराठा सेवा संघ (Maratha seva sangh) प्रणित जिजाऊ ब्रिगेड (jijau brigade) महाराष्ट्रचे पहिले विभागीय महा अधिवेशन (convention) येत्या शनिवार व रविवारी कोल्हापूरात होणार आहे. या दोन दिवसीय अधिवेशनात महिलांसाठी आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विषयांवर मंथन केले जाणार आहे.

शनिवार दि.२८ रोजी दुपारी चार वाजता अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला भव्य शोभायात्रा कोल्हापूर शहरात काढण्यात येणार असून, शोभायात्रेत महिलांचे लेझीम पथक, शिवकालीन शस्त्रकला यासह सामाजिक संदेश देणारे पथक राज्यभरातून सहभागी होणार आहेत.

सायंकाळी ८ वाजता अधिवेशन स्थळी राज्यभरातल्या जिजाऊ ब्रिगेडच्या महिला सांस्कृतिक कार्यक्रम (Cultural events) सादर करणार आहेत. रविवार दिनांक २९ रोजी सकाळी महिला शाहिरा दीप्ती सावंत आणि तृप्ती सावंत यांच्या शाहिरी जलसाने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे.

सकाळी दहा वाजता संयोगिताराजे संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. कार्यक्रमाचे  प्रास्ताविक कोल्हापूर जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष चारुशीला पाटील (charusheela patil) करतील, तर जिजाऊ ब्रिगेडची भूमिका प्रदेश महासचिव स्नेहाताई खेडेकर मांडणार आहेत. याप्रसंगी मराठा साहित्य (Maratha sahittya) सेवा संघाचे प्रा. गंगाधर बनबरे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान असणार आहे. तर सत्राच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे राहतील

याप्रसंगी मराठा साहित्य (Maratha sahittya) सेवा संघाचे प्रा. गंगाधर बनबरे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान असणार आहे. सत्राच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे राहणार आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com