वीज पडून दोन गायींचा मृत्यू

वीज पडून दोन गायींचा मृत्यू

सिन्नर। प्रतिनिधी Sinnar

शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात आज (दि.8) दुपारी 4 वाजेनंतर पुन्हा जोरदार पावसाने ( Heavy Rain )हजेरी लावली असुन सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे बघायला मिळाले. आधीच्याच पावसाने शेतांमध्ये पाणी साचून तळे साचल्याने पिके सडू लागली होती. त्यात आज (दि.8) पहाटे व पुन्हा दुपारनंतर सुरु झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडाली. तर खोपदी बु. येथे गोठ्यावर वीज पडून दोन गायींचा मृत्यू झाला.

शहरात पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावली होती. तर तालुक्यातील नांदूरशिंगोटे, दापुर, दोडी, निऱ्हाळे, मऱ्हळ, वावी, पांगरी, शहा, पंचाळे, देवपूर, डूबेरे, ठाणगाव, सोनांबे, कोनांबे शिवारातही सकाळी जोरदार पाऊस बरसला. यामुळे परिसरातील शेतमालाचे मोठे नुकसान झाले. काही गावांतील घरांमध्येही पाणी शिरल्याचे बघायला मिळाले. मात्र, दुपारनंतर पुन्हा कडाक्याचे ऊन पडल्याने उष्णता निर्माण झाली होती.

दुपारी 4 नंतर शहरासह काही भागात विजांच्या कडकडटासह मुसळधार पावसाची सुरुवात झाले. यामुळे शहरातील सर्व रस्ते जलमय झाले होते. सायंकाळी 6 नंतर तालुक्याच्या पूर्व भागातही विजांच्या कडकडटासह पुन्हा ढगफुटीसदृश पावसाची सुरुवात होऊन पिकांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने कांडा, मेथी, कोथिंबीर, टोमॅटो, वाटाना पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता.

वीज पडून दोन गायी ठार

तालुक्यातील खोपडी बुद्रुक येथे आज (दि.8) संध्याकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास गायीच्या गोठ्यावर वीज पडून दोन गाई ठार झाल्या.यामुळे शेतकऱ्याची मोठी अर्थिक हानी झाली आहे. संध्याकाळी संपुर्ण तालुक्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. खोपडी बु. शिवारात सिन्नर-वडांगळी रस्त्यालगत गुरुळे वस्तीवर राहाणाऱ्या अनिल दगडू गुरुळे या शेतकऱ्याच्या गाईंच्या गोठ्यावर वीज पडली. गोठ्यामध्ये बांधलेल्या सुमारे सव्वा लाखांच्या दोन गायी जागेवरच मृत पावल्या. घटनेची माहिती तलाठी यांना दिली असून पंचनामा करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com