कुनोमध्ये दोन चित्त्यांच्या पिल्लांचा मृत्यू; मृतांची संख्या पाचवर

कुनोमध्ये दोन चित्त्यांच्या पिल्लांचा मृत्यू; मृतांची संख्या पाचवर

नवी दिल्ली | New Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नामिबिया आणि आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्यांपैकी काही दिवसांपूर्वी तीन चित्त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा आज आणि परवा असे लागोपाठ दोन चित्त्याच्या पिलांचा (Cheetah Cubs) मृत्यू झाला आहे...

कुनोमध्ये दोन चित्त्यांच्या पिल्लांचा मृत्यू; मृतांची संख्या पाचवर
मालेगाव बाजार समितीच्या सभापतीपदी अद्वय हिरे, उपसभापतीपदी चव्हाण

याबाबत वनविभागाने (Forest Department) एक प्रेस नोट जारी केली असून त्यात म्हटले आहे की, "मादी चित्ता ज्वालाच्या निगराणी पथकाला ती तिच्या पिल्लांसह एका जागी बसलेली आढळली. काही वेळाने तिचे दोन पिल्ले मृत्यूमुखी पडल्याचे दिसून आले. त्यानंतर निरीक्षण पथकाने पशुवैद्यकांना कळवल्यावर ते घटनास्थळी पोहोचले. ही पिल्ले जन्मापासून अशक्त असल्याने अशक्तपणामुळे पिल्लांचा मृत्यू (Death) झाल्याचे वनविभागाने सांगितले.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) भारतात २० चित्ते आणले होते. त्यानंतर त्यांना मध्यप्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र २० चित्यांपैकी तिसऱ्या चित्त्याचा मृत्यू ९ मे रोजी झाला होता. तर मार्च आणि एप्रिल महिन्यात यातील आणखी दोन चित्ते मृत्यू पावले होते. त्यानंतर आता मे महिन्यात पुन्हा दोन चित्त्यांचा मृत्यू झाला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com