Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याSSR : गुजरातचा हा अधिकारी सीबीआय टीमचा प्रमुख

SSR : गुजरातचा हा अधिकारी सीबीआय टीमचा प्रमुख

नवी दिल्ली

सुशांत सिंह राजपूत (SSR) मृत्यु प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे (CBI) दिला. त्यानंतर मोदींच्या गुजरातमधून आलेल्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली टीम तयार करण्यात आली. Two CBI officers handling SSR’s death case served in Vadodar

- Advertisement -

SSR प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय !

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आता सीबीआयकडे गेले आहे. पाटण्यात एफआयआर (FIR) दाखल झाल्यानंतर सीबीआयची विशेष टीम तयार झाली. त्याचे नेतृत्व गुजरात केडरचे आयपीएस अधिकारी मनोज शशिधर करणार आहेत. या टीममध्ये गगणदीप गंभीर, नुपुर प्रसाद व अनिल यादव आहेत. मनोज शशिधर यांनी आजपर्यंत जे काम सुरु केले आहे, ते पुर्णच केले आहे. १९९४ च्या बँचचे ते अधिकारी आहे. जानेवारीत त्यांना सीबीआयचे जॉइंट डायरेक्टर केले गेले. गगणदीप गंभीर गुजरात केडरचे असून २००४ च्या बँचचे आहेत.

SSR : पार्थ पवार बोलले, ‘ सत्यमेव जयते ’

शिवाय सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास ईडीकडूनही सुरु झाला आहे. सुशांतच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करत आहे. सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये रिया चक्रवर्तीविरोधात आर्थिक फसवणुकीची तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणात ईडी चौकशी करत आहे. तिथे मात्र ईडी सुशांतच्या सर्व आर्थिक व्यवहारांवर बारीक लक्ष ठेवून आहे. ईडीच्या तपासात सुशांत आर्थिक विवंचनेत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सुशांतचं वार्षिक उत्पन्न ३० ते ३५ कोटी रुपये होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या