दारणा नदी पात्रात दोन सख्खे भाऊ बुडाले; बचाव कार्य सुरु

दारणा नदी पात्रात दोन सख्खे भाऊ बुडाले; बचाव कार्य सुरु

घोटी | जाकीर शेख Ghoti

इगतपुरी तालुक्यातील ( Igatpuri Taluka ) देवळे परिसरातील नदीपात्रात मासेमारी करायला गेलेले २ सख्खे भाऊ पाण्यात बुडाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. रविवार दि. १२ रोजी सायंकाळी ४ वाजेच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

स्थानिक ग्रामस्थांनी पोलीस आणि बचाव पथकाला पाचारण केले असून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. पंकज काशिनाथ पिंगळे, कृष्णा काशिनाथ पिंगळे रा. आवळखेड असे बुडालेल्या युवकांची नावे आहेत.

रविवारी सकाळी आवळखेड येथील काही युवक इगतपुरी तालुक्यातील देवळे गावाजवळील दारणा नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी गेले होते. यावेळी एक भाऊ पाण्यात बुडत असल्याचे पाहून दुसरा भाऊ त्याला वाचवण्यासाठी धावला. मात्र भावाला वाचवत काठावर आणीत असतांना अचानक दोघेही पुन्हा पाण्यात पडल्याने बुडाले.

या युवकांना शोधण्यासाठी स्थानिक नागरिक व पोलीसांनी प्रयत्न केले मात्र ते मिळुन आले नाही. अखेर पोलीसांनी कसारा येथील आपत्ती टीमला घटनास्थळी पाचारण केले असुन रात्री उशिरापर्यंत या युवकांना शोधण्याचे काम सुरु होते. या दुर्देवी घटनेमुळे आवळखेड गावावर शोककळा पसरली असुन हळहळ व्यक्त केली जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com