तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू

तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू

येवला | प्रतिनिधी | Yeola

तालुक्यातील अनकाई किल्ल्यावर (Ankai Fort) दोन तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी कोपरगाव येथील काही पर्यटक अनकाई किल्ल्यावर पर्यटनासाठी आले होते. यात कोपरगाव शहरात राहणारे मिलिंद रवींद्र जाधव (Milind Ravindra Jadhav) (20) आणि रोहित पिंटू राठोड (Rohit Pintu Rathod) (14, दोघे रा. धारणगाव रोड, कोपरगाव) हे पोहण्यासाठी अनकाई किल्ल्यावरील (Ankai Fort) तळ्यात उतरले असता पाण्याचा व तळ्याच्या खोलीचा अंदाज आला नसल्याने दोघा मित्राचा बुडून मृत्यू झाला.

तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
विनायक मेटेंच्या मृत्यूबाबत मोठा गौप्यस्फोट; ऑडीओ क्लिप व्हायरल

या घटनेची माहिती इतर पर्यटकांनी गावातीलच रमजान सय्यद यांना दिली. रमजान सय्यद यांनी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते राजूसिंग परदेशी यांना घटनेची माहिती दिली. परदेशी यांनी तात्काळ येवला तालुका पोलिसांना (Yeola Police) माहिती दिली.

तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
रुसवे फुगवे बाजूला ठेऊन कामे करा; भुजबळांची राज्य सरकारवर टीका

यानंतर गावातील ग्रामरक्षक दलातील पोहणाऱ्या तरुणांच्या सहाय्याने बुडालेल्या दोघा तरुणांचा मृतदेह एक तासाच्या अथक प्रयत्नाअंती तलावातून बाहेर काढण्यात आला.

तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
नाशकात श्रावणसरींचा अभिषेक, 'वाचा' कोणत्या धरणातून होतोय किती विसर्ग?
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com