Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजनसिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाचे महाराष्ट्र कनेक्शन; दोघांना अटक

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाचे महाराष्ट्र कनेक्शन; दोघांना अटक

पुणे । Pune

पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला (punjabi singer sidhu moosewala ) यांची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या (Murder by shooting) करण्यात आली होती. मुसेवाला यांच्या हत्येची कबुली लॉरेन्स बिश्नोईने दिली होती. त्यानंतर आता या हत्येचे महाराष्ट्र कनेक्शन (Maharashtra Connection with Moosewala’s Murder) समोर आले आहे…

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुसेवालाच्या हत्येसाठी एकूण ८ शूटर पंजाब (Punjab) राजस्थान (Rajasthan) आणि महाराष्ट्रातून (Maharashtra) बोलावण्यात आले होते. यामध्ये पुण्यातील (pune) दोन शूटरचा (shooter) समावेश असल्याचे समोर आले आहे.

पंजाब पोलिसांनी (Punjab Police) केलेल्या तपासामध्ये सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव (Saurabh Mahakal & Santosh Jadhav) या दोघांची नावे समोर आली असून त्यांना पंजाब पोलिसांनी पुण्यामधून ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, सिद्धू मुसेवाला यांची २९ मे रोजी काही अज्ञात व्यक्तींनी (Unknown person) गोळ्या झाडून हत्या केली. सिद्धू मुसेवाला (Sidhu moosewala) आपल्या काळ्या रंगाच्या थार गाडीमध्ये गुरविंदर सिंग आणि गुरप्रीत सिंग या दोन मित्रांसहीत प्रवास करत असताना घरापासून काही अंतरावर त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या