Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशTwitter चा दणका! आता Blue Tick हवी असेल तर मोजावे लागणार पैसे

Twitter चा दणका! आता Blue Tick हवी असेल तर मोजावे लागणार पैसे

मुंबई | Mumbai

मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरचे (Twitter) सीईओ एलोन मस्क (Elon Musk) यांनी त्यांच्या घोषणेनुसार लेगसी व्हेरिफाईड अकाउंटवरील ब्लू टिक्स काढून (Blue Ticks) टाकले आहेत. म्हणजे असे हॅण्डल ज्यांना ट्विटरची सशुल्क सेवा न घेता ब्लू टिक मिळाले होते.

- Advertisement -

बालविवाह प्रतिबंधासाठी धडक मोहीम

त्या अकाऊंटवरुन आता ब्लू टिक हटवण्यात आली आहे. ट्विटरने रात्री 12 वाजल्यापासून जगभरातील बडे नेते, अभिनेते आणि खेळाडूंसह सामान्य यूजर्सची ब्ल्यू टिक सर्व्हिस बंद केली आहे. आता ज्यांना ब्ल्यू टिक हवी असेल, त्यांना आता पेड सर्व्हिस घ्यावी लागणार आहे.

गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी आता हद्दपारीची कारवाई

त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, क्रिकेटपटू विराट कोहली, अभिनेता शाहरुख खान यांच्यासह अनेक दिग्गजांच्या अकाउंटवरील ब्ल्यू टिक हटवण्यात आली आहे. गुरुवारी रात्री 12 वाजल्यापासूनच हा नियम लागू करण्यात आला आहे.

नाशिक शहर क्षयरोगमुक्त करण्यासाठी विशेष उपाययोजना; ‘इतक्या’ क्षयरुग्णांचे निदान

खरंतर, ट्विटरचे मालक एलोन मस्क (Elon Musk) यांनी १२ एप्रिललाच घोषणा केली होती की २० एप्रिलपासून सर्व लेगसी व्हेरिफाईड अकाऊंटचे ब्लू टिक काढून टाकले जातील. खरंतर, ट्विटरचे मालक एलोन मस्क यांनी १२ एप्रिल दरम्यानच ही घोषणा केली होती की २० एप्रिलपासून सर्व लेगसी व्हेरिफाईड अकाऊंटचे ब्लू टिक काढून टाकले जातील. त्यानुसार कालं रात्रीपासून हा नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आता कोणालाही ब्ल्यू टिक हवी असेल तर त्यासाठी तुम्हला दर महिन्याला पैसे मोजावे लागणार आहे.

ब्ल्यु टिक सर्विस कशी मिळणार?

ज्यांना कोणाला ब्ल्यू टिक हवी असेल किंवा आपली ब्ल्यू टिक सर्व्हिस कायम ठेवायची असेल त्यांना आता ट्विटर ब्ल्यूचं सब्सक्रिप्शन घ्यावं लागणार आहे. भारतात ट्विटर ब्लूचे सबस्क्रिप्शन रु. 650 पासून सुरु होते. मोबाईल युझरसाठी ते दरमहा 900 रुपये आहे.

ट्विटरची या आधी पॉलिसी काय होती?

यापूर्वी, ट्विटर राजकारणी, अभिनेते, सेलिब्रिटींच्या, पत्रकारांसह अकाऊंटला ब्लू टिक देत असे. यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नव्हते, मात्र एलोन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर कंपनीने अनेक मोठे बदल केले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या