जगभरात Twitter डाऊन; वापरकर्त्यांना मोठी अडचण

जगभरात Twitter डाऊन; वापरकर्त्यांना मोठी अडचण

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

आज (4 नोव्हेंबरला) ट्विटरने यूजर्सला मोठा झटका दिला आहे. जगभरातील अनेक भागात ट्विटर (Twitter) अनेक ठिकाणी डाऊन झाल्याचे समोर आले आहे. असंख्य ट्विटर युजर्सनी (Twitter Users) ट्विटर डाऊन(Twitter Down) झाल्याच्या तक्रारी नोंदवल्या आहेत.

युजर्सना सध्या त्यांचे ट्विटर अकाउंट ऍक्सेस (Twitter account access) करण्यात अडचणी येत आहेत. वापरकर्ते त्यांच्या फीडमध्ये प्रवेश करत असताना अडचणी येत आहेत.

जगभरात Twitter डाऊन; वापरकर्त्यांना मोठी अडचण
Visual Story प्राजक्ताच्या या हटके फोटोशूटने केले घायाळ...

'काहीतरी चूक झाली आहे, पण काळजी करू नका - आणखी एकदा प्रयत्न करा' अशा संदेशासह फीड पृष्ठ रिकामे उघडत आहे. वेब वापरकर्ते त्यांच्या फीडमध्ये प्रवेश करू शकत नसल्याने वापरकर्त्यांची मोठी अडचण होत आहे.

जगभरात Twitter डाऊन; वापरकर्त्यांना मोठी अडचण
Video : धकाधकीच्या जीवनात शांतता पाहिजे? सुरगाण्यातील 'या' ठिकाणी एकदा भेट द्याच

अ‍ॅप वापरकर्त्यांचे ट्विटर सुरू आहे. वेब ब्राउजरमध्ये न चालल्यानंतर फोन चेक केला असता ट्विटर चालू होते, असे काही वापरकर्त्यांनी सांगितले. मात्र परंतु काही मिनिटांनंतर ते देखील बंद झाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com