Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याजगभरात Twitter पुन्हा डाऊन; वापरकर्ते संतापले

जगभरात Twitter पुन्हा डाऊन; वापरकर्ते संतापले

मुंबई | Mumbai

सर्वात जास्त लोकप्रिय असणाऱ्या सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म ट्विटरची सेवा पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. मागील एका तासापासून जगभरात ट्विटरची (Twitter) सेवा डाऊन झाली आहे. ट्विटरची सेवा ठप्प झाल्यामुळे जगभरातील वापरकर्त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे…

- Advertisement -

शासकीय रुग्णालयात परिचारिकेला मारहाण : जिल्हा शल्यचिकित्सकांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

ट्विटरची सेवा डाऊन झाल्यामुळे अनेक वापरकर्ते त्यांच्या पेजवर कोणतेही नवीन ट्वीट पाहू शकत नाहीत. तर यासंबंधी अनेक लोकांनी आपल्या तक्रारी व्यक्त केल्या असून सोशल मीडियावर #TwitterDownचा ट्रेंड सुरू करण्यात आला आहे. इलॉन मस्क (Elon Musk) यांनी मालकी घेतल्यापासून आतापर्यंत चौथ्यांदा ट्विटर डाऊन झाले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

अंबादास दानवेंचे विधानपरिषदेच्या उपसभापतींना पत्र; मुख्यमंत्र्यांविरोधात केली ‘ही’ मोठी मागणी

तसेच डाऊन डिटेक्टरनुसार, ट्विटरवर हा प्रॉब्लेम दुपारी ३. ४७ वाजल्यापासून यायला सुरुवात झाली. यामुळे जगभरातील ट्विटरच्या वापरकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. ट्विटरमध्ये गडबड झाल्याच्या तक्रारी वेगवेगळ्या देशांमधून येऊ लागल्या. वापरकर्ते ट्विटर मोबाईल आणि वेबसाईटवर वापरू शकत नव्हते. याशिवाय वापरकर्त्यांनी “ट्विटरवर आपले स्वागत आहे!” दिसत आहे का अशी तक्रार देखील केली.

…तर कारवाई व्हायलाच हवी; राऊतांच्या ‘त्या’ विधानावर अजित पवार स्पष्टच बोलले

दरम्यान, याआधी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला, ट्विटरची सेवा काही तासांसाठी ठप्प झाली होती. त्यावेळीही वापरकर्त्यांना कोणताही नवीन मेसेज दिसत नव्हता किंवा कोणतीही नवीन पोस्ट करु शकत नव्हते. तसेच ट्विटर डाऊन झाल्यानंतर फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स सुद्धा केल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या