Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशTwitter ची चिमणी परतली! Dogecoin ला तीन दिवसात बदलले

Twitter ची चिमणी परतली! Dogecoin ला तीन दिवसात बदलले

मुंबई | Mumbai

ट्विटरचे सीईओ एलन मस्क (Elon mask) यांनी ट्विटरचा (twitter) पदभार स्वीकारल्यापासून ट्विटरमध्ये बऱ्याच प्रमाणात बदल केल्याचे पाहायला मिळाले आहे. या सततच्या बदलांमुळे एलन मस्क हे कायम चर्चेत असतात.

- Advertisement -

एलन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरचा लोगो असणारा ब्लू बर्ड(blue bird) काढून त्याजागी Dogecoin ट्विटरच्या होम पेज वर ठेवली होती. मात्र अवघ्या चारच दिवसात त्यांना ही Dogecoin बदलून आपला आयकॉनिक लोगो पुन्हा ठेवला आहे.

नगर-कल्याण महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; इनोव्हा-पिकअपच्या धडकेत ५ ठार

एलन मस्क यांना कदाचित कुत्र्यांबद्दल इतके प्रेम आहे की, त्यांनी पूर्वी त्याचे पाळीव प्राणी शिबा इनू फ्लोकी यांना ट्विटरचे सीईओ बनवले होते. बदलानंतर, शिबा इनू ट्विटरच्या लोगोवर देखील दिसत होता. आता एलन मस्कने अस का केल, यासाठी मस्कच्या क्रेझशिवाय इतर कोणालाही सांगता येणार नाही.

अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी कनेक्शन, माजी स्वीय सहाय्यकांचा आरोप

मात्र आता पुन्हा ट्विटरच्या लोगोची चर्चा सुरू झाली आहे, कारण आता ब्लू बर्ड पुन्हा परतला आहे. आता ट्विटर खरोखर ट्विटरसारखे दिसत असल्याचे नेटकऱ्यांकडून म्हणण्यात येत आहे. ३ दिवसांपूर्वी , मस्कने ट्विटरचा लोगो Dogecoin लोगोमध्ये बदलून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. लोकांना वाटले की Dogecoin लोगो काही तासच राहील आणि नंतर निघून जाईल, मात्र तसे झाले नाही आणि Dogecoin लोगो ही ट्विटरची ओळख असेल असे वाटत होते. पण हा लोगो ३ दिवस राहिला.

दरम्यान, एलन मस्क यांनी ट्विटरच्या लोगोमध्ये बदल का केला, यावर अद्याप कोणतीही स्पष्टता नाही, परंतु मस्क केवळ Dogecoin गुंतवणूकदारांकडून त्याच्याविरुद्धच्या खटल्यापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

अमोल कोल्हे करणार अमृता खानविलकरशी लग्न? Instagram पोस्टमुळे चर्चांना उधाण

ट्विटर सब्सक्रिप्शनवर अधिकचे फायदे

या आधी फक्त सेलिब्रिटी, सरकारी संस्था किंवा प्रसिद्धीझोतात असलेल्या व्यक्तींना ट्विटरकडून व्हेरिफाईड टॅग असलेलं ब्लू टिक दिलं जायचं. दरम्यान, आता एलन मस्क यांच्या सबस्क्रिप्शन प्लॅन अंतर्गत, कोणीही दरमहा पैसे देऊन ब्लू टिक खरेदी करू शकणार आहे. मात्र, यासोबतच ब्लू टिक युजर्सना काही विशेष सुविधा देखील मिळणार आहे, जसे की, यासोबतच ट्वीटमध्ये एडिट किंवा अनडू पर्याय उपलब्ध असणे आणि ट्वीटची कॅरेक्टर लिमिट अधिक असणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या