
नाशिक | प्रतिनिधी Nashik
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त (azadi ka amrut mahotsav) ‘आझादी सॅट’ (Azadi Sat) हा आठ किलोग्रॅम वजनाचा उपग्रह (7 ऑगस्ट) सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटांनी श्रीहरीकोट्टा (sriharikota) येथून अवकाशात झेपावणार आहे. जो तयार करण्यामध्ये देशाच्या ग्रामीण भागातील (Rural Area) 75 शाळांमधील 750 विद्यार्थिनींनी सक्रीय सहभाग घेतला आहे. हा उपग्रह भारताचा राष्ट्रध्वज घेऊन अंतराळात जाणार आहे....
या उपक्रमात महाराष्ट्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (Maharashtra Zilla Parishad primary school kondure tal kalmanuri dist hingoli), कोंढुरे, ता.कळमनुरी, जि. हिंगोली आणि न्यू इंग्लिश स्कुल, बुद्रुक, जि.नगर (New English School budruk dist ahamadnagar) या दोन शाळांमधील 20 विद्यार्थिनींचा सक्रीय सहभाग आहे. या विद्यार्थिनी त्यांच्या शिक्षकांसह श्रीहरी कोट्ट्याला पोहोचत असून त्यांनीच बनवलेल्या उपग्रहाचे थेट प्रक्षेपण बघण्यासाठी त्यांना ‘इस्त्रो’ने खास आमंत्रित केले आहे.
विद्यार्थिनींचा अंतराळ संशोधनात कल वाढावा आणि त्यांनी करियर म्हणून या क्षेत्राकडे पाहावे या उद्देशाने ही मोहिम आखण्यात आली होती.
मोहिमेसाठी ‘स्पेस किड्ज इंडिया’ (Space Kids India) ही संस्था नीती आयोगाच्या (Niti Ayog) मार्गदर्शनाखाली काम करत आहे. या मोहिमेसाठी मुलींची निवड झाल्यावर शाळांना वेगवेगळे पण प्रत्येकी एक किट पाठवण्यात आले. त्यात तापमानाशी संबंधित नोंदी विद्यार्थिनींनी करायच्या होत्या. ते किट कसे वापरायचे? प्रोगॅमिंग कसे करायचे?
नोंदी कशा करायच्या? याचा नेमका वापर कसा होणार आहे? याविषयीचे विद्यार्थिनींना ऑनलाईन दिले गेले. त्यानुसार विद्यार्थिनींनी ते किट तयार केले आणि परत पाठवले. त्या प्रोग्रॅमिंगचा समावेश आझादी सॅट (Azadi Sat) या उपग्रहात करण्यात आला आहे, अशी माहिती न्यू इंग्लिश स्कुल, कोल्हार बुद्रुक, जि.नगर या शाळेचे विज्ञान विषयाचे शिक्षक दत्तात्रय अंगद घवले यांनी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोंढुरे, ता.कळमनुरी, जि. हिंगोली शाळेचे विज्ञान विषयाचे शिक्षक शंकर लेकुले यांनी दिली. हे दोन्ही शिक्षक विद्यार्थिनींसोबत श्रीहरीकोट्ट्याला (sriharikota) गेले आहेत.
यानिमित्ताने ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना अंतराळ या क्षेत्राचा थोडाफार तरी परिचय झाला. या क्षेत्रात पुढे जाऊन बर्याच संधी उपलब्ध असतात हेही त्यांना वरवर का होईना पण समजले. देश जो उपग्रह सोडणार आहे त्यात सक्रीय सहभाग आला. म्हणजेच देशासाठी अल्पसे काम करता आले हीच मुलींची भावना आहे.
त्यांचे पालकही त्यामुळे खुप उत्साहित आणि आनंदी आहेत. छोट्याशा गावातील विद्यार्थिनींचा हा सहभाग म्हणजे गावाचाच सन्मान (honor of the village) आहे अशी गावकर्यांची भावना आहे. त्यामुळे मुलींनी श्रीहरीकोट्ट्याला पोहोचावे यासाठी मान्यवर, गावकरी आणि पालकांनी आर्थिक सहभाग देखील घेतला असेही दोन्ही शिक्षकांनी आवर्जून सांगितले.
आमच्या शाळांमधील मुलींना या उपक्रमामुळे खुपच प्रेरणा मिळाली. ते काम करताना त्या खुपच उत्साहित होत्या. उपग्रह निर्मितच्या कामात आपल्याला सहभाग घेता येईल असे त्यांना कधीच वाटले नव्हते. पण ते प्रत्यक्ष घडले आहे.
* दत्तात्रय घवले, न्यू इंग्लिश स्कुल, कोल्हार बुद्रुक, जि.नगर * शंकर लेकुले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोंढुरे, ता.कळमनुरी, जि. हिंगोली