Thursday, April 25, 2024
Homeजळगावमुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हणुन बारा खाते दिले - आ.खडसे

मुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हणुन बारा खाते दिले – आ.खडसे

भुसावळ । प्रतिनिधी bhusawal

राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) पक्षात एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse) गेले तेव्हापासून त्यांनी भाजपाची (bjp) बदनामी सुरू केली आहे, असा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात बोलतांना केला होता. या संदर्भात आ.एकनाथराव खडसे यांना विचारले असता ते म्हणाले की, मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार होतो, म्हणून मला 12 खाते दिली होती, मी कधीही भाजपाची बदनामी केलेली नाही.

- Advertisement -

आ.खडसे पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने मला काहीच दिलेले नाही असे मी कधीही म्हटलेले नाही. भाजपाने मला जे-जे दिले त्यावर मी समाधानी होतो. मी देखील भाजपाला माझ्या आयुष्यातील 40वर्षे दिली. यावेळी मी मुख्यमंत्री पदाचा प्रमुख दावेदार होवू शकतो किंबहूना झालो, तेव्हा मला भाजपाने नव्हे तर भाजपाच्या एक दोन लोकांनी त्रास देवून माझ्याविरूध्द खोटे-नाटे कुभांड रचले व मी पक्षातून बाहेर कसा पडेल यासाठी षडयंत्र केले.

ना.फडणवीस म्हणतात, मी भाजपाची बदनामी करतोय तर त्यांनी एखादे उदाहरण सांगवे की माझ्या वक्त्यव्यामुळे भाजपाची बदनामी झालेली असेल? कारण माझा रोष हा भाजपावर नसून भाजपा मधील एक दोन जणांवरच आहे. राहीला प्रश्न राष्ट्रवादीने मला काय दिले असा आहे.

माझे ऐनवेळी विधानसभेचे तिकिट कापून मला राजकिय विजनवासात पाठविले. वेगवेगळ्या चौकशा लावून कायम त्यात कसा गुंतून राहिल हे पाहिले. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार, खा.सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, विरोधी पक्ष नेते अजित पवार, जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मला राष्ट्रवादी पक्षात घेवून विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे, असे आ.एकनाथराव खडसे म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या