Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यात्र्यंबकेश्वर प्रकरणावरून तुषार भोसलेंचे राऊतांवर टीकास्त्र

त्र्यंबकेश्वर प्रकरणावरून तुषार भोसलेंचे राऊतांवर टीकास्त्र

मुंबई | Mumbai

त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात (Trimbakeshwar Temple) उरुस दरम्यान इतर धर्मियांकडून बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवार (दि.१३ मे) रोजी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडली होती. त्यानंतर मंदिर प्रशासनाने वाद घालणाऱ्या जमावाला रोखले होते. तसेच पोलिस आणि मंदिर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला होता. मात्र, यावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असून हा वाद आणखी वाढतांना दिसत आहे. अशातच आता भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा दावा खोडून काढत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत…

- Advertisement -

तुषार भोसले म्हणाले की, “संजय राऊत यांनी अशी भूमिका मांडली की त्र्यंबकेश्वर मंदिरात संदलची धूप दाखवण्याची शंभर वर्षांची परंपरा आहे. मग महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) अनेक नेत्यांनी तिच रीघ पुढे रेटली. याचा पुरावा देताना अनेक माध्यमातून स्थानिक शांतता समितीची एक पत्रकार परिषद दाखवली गेली. यामध्ये त्यांनी म्हटले की ही परंपरा जुनी आहे. पण माझं आजही चॅलेंज आहे की ती पत्रकार परिषद नीट ऐकली तर त्यात म्हटलं की ही परंपरा जुनी आहे पण चौकात धुप दाखवण्याची परंपरा आहे. पण यावेळी ते मंदिराच्या प्रवेशद्वारावर का गेले हे आम्हाला कळले नाही. त्यामुळे संजय राऊतांचे दात घशात घालण्याचे काम केले आहे. असे त्यांनी म्हटले.

तसेच पुढे भोसले यांनी एक व्हिडिओ दाखवत दावा केला की, त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात धूप दाखवतानाचा मागच्या वर्षीचा व्हिडिओ आहे. त्यात तो व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीने दावा केला की मागच्या वर्षी आम्ही मंदिरात गेलो होतो तर मग आता आम्हाला का अडवण्यात आले. पण ही व्यक्ती त्र्यंबकेश्वर वाद (Trimbakeshwar controversy) प्रकरणात ज्या चार लोकांवर गुन्हा दाखल झाला त्यातील हा एक मुख्य आरोपी आहे. हा आरोप सलमान सय्यद एक गुन्हेगार असून त्याने एका अल्पवयीन हिंदु मुलीचे लैंगिक शोषण केले आहे. त्याच्यावर २०१८ मध्ये पोक्सोसह विविध गुन्हेगारी कलमे दाखल आहेत. या व्यक्तीवर नाशिकच्या कोर्टात खटला सुरु आहे. तसेच उरुस आयोजकांमध्ये जे लोक सहभागी होते ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यांपैकी ड्रग्ज सप्लायर, हत्यारांचे पुरवठादार आहेत. याची खात्री करण्यासाठी सगळी माहिती एसआयटीकडे (SIT) देण्यात येणार असल्याचे तुषार भोसले यांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या