Tuesday, April 23, 2024
Homeदेश विदेशतुर्कस्तान भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं; 'इतक्या' जणांचा मृत्यू

तुर्कस्तान भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं; ‘इतक्या’ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये (Turkey and Syria) आज (सोमवार) सकाळच्या सुमारास भूकंपाचे (Earthquakes)तीव्र धक्के बसले. ७.८ मॅग्निट्यूडच्या या भूकंपाच्या धक्क्यांनी तुर्कस्तानासह मध्यपूर्वेतील अनेक देश हादरले आहेत. या भूकंपामुळे दोन्ही देशातील शेकडो इमारती कोसळल्या असून अनेक जणांची कुटुंब रस्त्यावर आली आहेत…

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या भूकंपात तुर्कस्तान आणि सीरियामध्ये तब्बल ६०० हून अधिक लोक मृत्यूमुखी (Death)पडले आहेत. तर २,५०० हून अधिक लोक जखमी झाले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तसेच भूकंपामुळे झालेल्या नुकसानीबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शोक व्यक्त केला असून भूकंपग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

दरम्यान, मोदींच्या या आश्वासनानंतर सचिव डॉ. पी. के. मिश्रा यांनी बैठक बोलवली असून तुर्की आणि सिरियला मदत पाठवण्यावर चर्चा केली. याशिवाय एनडीआरएफच्या जवान आणि बचाव पथकांना तुर्की आणि सिरियाला पाठवण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले असून १०० जणांची दोन पथकेही तात्काळ रवाना होणार आहेत. तसेच औषधं, गोळ्या, डॉक्टर आणि इतर मेडिकल मदत देखील पाठविण्यात येणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या