अभिनेत्री तुनिषा शर्मा प्रकरणात पहिली अटक; आत्महत्येचं रहस्य उलगडणार?

अभिनेत्री तुनिषा शर्मा प्रकरणात पहिली अटक; आत्महत्येचं रहस्य उलगडणार?

मुंबई । Mumbai

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केली आहे. टीव्हीवरील ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेत ती मुख्य भूमिका साकारत होती. तिच्या आत्महत्येनंतर सिनेसृष्टीसह सर्वत्र खळबळ उडाली आहे. तुनिषाने मालिकेच्या सेटवरच गळफास घेऊन जीवन संपवल्याने सर्वांनाचा धक्का बसला आहे. तिच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

अभिनेत्री तुनिषा शर्मा प्रकरणात पहिली अटक; आत्महत्येचं रहस्य उलगडणार?
विद्यार्थिनीला शिक्षकाने पाठवला अश्लील मेसेज; घरच्यांनी शिकवला चांगलाच धडा, केली यथेच्छ धुलाई

या प्रकरणी तुनिषाची आई वनिताने अभिनेता शीजान खान याच्याविरोधात पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी शीजानला अटक केली असून आज त्याला वसईच्या कोर्टात हजर केलं जाणार आहे. शीजान हा तुनिशाचा सहकलाकार आहे. दोघांचे प्रेमसंबंध होते. दोघे रिलेशनमध्ये होते. मात्र, त्यांचा ब्रेकअप झाल्याने तुनिशा तणावाखाली होती. त्यातूनच तिने आत्महत्या केल्याचं सांगितलं जातं.

अभिनेत्री तुनिषा शर्मा प्रकरणात पहिली अटक; आत्महत्येचं रहस्य उलगडणार?
धुणे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकींचा पाण्यात बुडून मृत्यू, हृदय पिळवटून घटना

कोण आहे शीझान खान?

शीझानचा जन्म ९ सप्टेंबर १९९४ रोजी मुंबईत झाला आणि इथेच त्याने शिक्षण पूर्ण केले. त्याने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. प्रसिद्ध 'जोधा अकबर' मालिकेत त्याने तरुण अकबराची भूमिका साकारली होती. दरम्यान तो 'अली बाबा : दास्तान-ए-काबुल'मध्ये अलीबाबाच्या भूमिकेत होता.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com