तुकाराम मुंडे यांची पुन्हा बदली : आता मिळाले हे पोस्टींग

तुकाराम मुंडे यांची पुन्हा बदली : आता मिळाले हे पोस्टींग

मुंबई

धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. नागपूर महापालिकेत आयुक्तपदी कार्यरत असताना ते सत्ताधारी भाजपविरुद्ध प्रशासन अशा वादात सापडले होते. एकंदरीत तुकाराम मुंडे यांच्या बदलीची यादी वाढत चालली आहे.

२००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या तुकाराम मुंडे यांची नागपूरच्या आयुक्तपदावरून काही महिन्यांपूर्वी बदली झाली होती. त्यानंतर तुकाराम मुंडे यांच्याकडे कुठल्याही विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली नव्हती. त्यामुळे ते पदभाराविना होते. आता त्यांना राज्य मानवाधिकार आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती केली आहे.

तुकाराम मुंढे यांची ५ महिन्यापूर्वी नागपूरच्या महापालिका आयुक्तपदावरुन, मुंबईत महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी बदली झाली होती. तुकाराम मुंढे यांचा मोठा चाहता वर्ग सोशल मीडियावर आहे. तुकाराम मुंढे यांच्यासारख्या धडाडीच्या अधिकाऱ्यांच्या जेव्हा सतत बदल्या होतात, तेव्हा हा चाहता वर्ग नक्कीच नाराज होतो. कोणतेही सरकार आले तरी तुकाराम मुंडे यांची बदली होतेच हे मात्र नक्की.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com