Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याआजपासून सक्रिय क्षयरोग शोधमोहीम

आजपासून सक्रिय क्षयरोग शोधमोहीम

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण National Tuberculosis Eradication कार्यक्रमांतर्गत भारत सरकारने सन 2025 पर्यंत देश क्षयरोगमुक्त करण्याचे महत्त्वाकांक्षी धोरण निश्चित केलेले आहे. यामध्ये क्षयरोगाचे दुरीकरण करणे हा उद्देश आहे. अद्ययावत टीबी TB केसेसच्या आकडेवारीनुसार असे लक्षात येते की, टीबीचे प्रमाण कमी होत आहे. जिल्हा पातळीवरून टीबी दुरीकरणासाठी अनेक प्रकारे प्रयत्न केले जात आहेत.त्याचाच एक भाग म्हणून सोमवार (दि.15) पासून जिल्ह्यात सक्रिय क्षयरोग शोधमोहीम राबवण्यात येणार आहे.

- Advertisement -

या अनुषंगाने जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांच्या अधिपत्याखाली जिल्हा सक्रिय क्षयरोग मोहीम राबविण्यात येणार आहे.

सोमवार दि. 15 नोव्हेंबर 21 ते 25 नोव्हेंबर 2021 पहिला टप्पा व दि. 13 डिसेंबर ते 23 डिसेंबर 2021 दुसरा टप्पा असून आशा व स्वयंसेवक यांच्यामार्फत घरोघरी क्षयरुग्ण शोधण्याचे काम सुरू होणार आहे. प्रशिक्षित आशांमार्फत घरोघरी जाऊन थुंकी नमुने गोळा केले जाणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यात क्षयरोगासाठी अतिजोखमीचा भाग निवडून या भागात एकूण 387 पथकांमार्फत तपासणी होणार आहे.

या टीममार्फत पाच लाख 70 हजार 815 लोकसंख्येची तपासणी करण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी आपल्या घरी येणार्‍या आशा कार्यकर्तीस सहकार्य करून संभावित लक्षणे असणार्‍या रुग्णांची थुंकी तपासणी व क्ष किरण तपासणी करून घ्यावी व शासनाला क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमास सहाकार्य करावे, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा क्षयरोग केंद्र नाशिक यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या