प्रदूषण मुक्तीचा संंकल्प करा

केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंंत्री नितीन गडकरी
प्रदूषण मुक्तीचा संंकल्प करा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

जागतिक मापदंंडा नुसार जल, वायु, व ध्वणी प्रदुषण pollution संपुष्टात आणण्याचा संंकल्प नाशिक महापालिकेने केल्यास नाशिककरांंना आरोग्यदायी व शतायुषी आयुष्य लाभल्या शिवाय राहणार नाही.असा विश्‍वास केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंंत्री नितीन गडकरी Union Minister for Roads, Transport and Highways Nitin Gadkari यांनी व्यक्त केला. नाशिक महापालिकेेच्या प्रभाग क्रमाक तीन मधील हिरावाडीतील पंडीत दिनदयाळ उपाध्याय थीम पार्कचा Pandit Dindayal Upadhyay theme park लोकार्पण सोहळा व गडकरीे यांच्या हस्ते शानदार समारंभात झाला. त्यावेळी ते बोलत होते.

केंंद्रीय आरेाग्य कुटुंंब कल्यान मंत्री डॉ. भारती पवर, महापौर सतीश कुलकर्णी , आमदार राहुल ढिकले, साीमा हिरे, देवयानी फरांदे यांच्यासह नगरसेवक व पदाधीकारी उपस्थीत होते.

मंत्री गड़करी म्हणाले की, येथील नगरसेवकांनी अतिशय सुंदर उद्यान निर्माण केल आहे.येथे प्राणायाम योगा केला, रोज सकाळ सायंकाळ फिरण्यास आले आरोग्य लाभल्याशिवाय राहणार नाही. येथे गोदावरीचे शुध्द पाणी आहेे. सुंंरद हवामान आहे. हे शहर असेच सुंदर व स्वच्छ् असले पाहीजे. जागतिक स्तरावरील मापदंंडा नुसार प्रदुषण मुक्तीचा संकल्प महापीलेकेनेेे केला पाहीजे.

ध्वणी प्रदुषण कमी करण्यासाठी परिवहन मंंत्री म्हणुन लवकरच कर्कश हॉर्न बंद करण्याचा निर्णय घेणार आहे. भारतीय वाद्यावरील धुन प्रत्येक वाहनावर वाजेल अशी व्यवस्था केली जात आहे.

तीन चार वर्षात दहा ट्क्के पेेट्रोल व २५ ट्‌क्के डिझेल चा खप कमी करण्याचा प्रयत्न आहे. सीएनजीचा जसजसा वापर वाढेल तसतशी खर्चात बचत हेाईल व प्रदुषणही कमी होईल .नाशिक महापालिकेने सुध्दा सीएनजीचा विचार केला पाहीजे. प्रदुषण कमी करणाची जबाबादारी महापालीकेने स्वीकारली पाहीजे. आत्मनिर्भर भारतचे स्वप्न साकारकरण्यासाठी प्रत्येकाला सामाजिक, आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन दिले पाहीजे व लाभले पाहीजे. असे ते म्हणाले.

यावेळी डॉ. भरती पवार, महापौर कुलकर्णी , आमदार ढिकले, माजी आमदार बाळासाहेब सानप, विजय साने, प्रियांका मानेे यांचे भाषण झाले. लक्ष्मण सावजी, गिरीश पालवे, गणेश गिते. महेश हिरे, जगन पाटील सुनील केदार, मच्छ्‌ींद्र सानप, पुनम मोगरे,ऋची कुंंभारकर, पुनम मोगरे, आयुक्त कैलास जाधव, अरुण पवार,प्रशातं जाधव, कमलेश बोडके, उपस्थीत होते. नशल्पकार निलेश चाव्हााण, सोनाली चव्हाण यांचा गडकरी यांच्या ह्स्ते सत्कार करण्यात आला. अमीत घुुगे यांनी सत्रसंचालन केले.

सोमवारी आडगांव नाका ते जत्रा हॉटेल उड्डान पुलाचे सायंकाळी ६. वा. डिजिटल तंत्रज्ञानाव्दारे लोकापर्ण सोहळा मंत्री गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. लोकार्पण सोहळयाच्या कार्यक्रमास डॉ.भारती पवार राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंंत्री एकनाथ शिंदे, उपस्थित राहणार आहेत .

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com