Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकहून वर्षभराच्या प्रवासानंतर महाकाय कंटेनर पोहोचला केरळला...

नाशिकहून वर्षभराच्या प्रवासानंतर महाकाय कंटेनर पोहोचला केरळला…

सातपूर | प्रतिनिधी Satpur

नाशिकहुन मागील वर्षी जुलै महिन्यात अतिविशाल ऑटोक्लेव्ह व्हेसल हे उत्पादन एका 72 चाकी ट्रेलर वरून अडथळ्यांच्या शर्यतीनंतर तब्बल वर्षभरानंतर केरळमधील तिरुवनंतपूरमला रविवार पोहोचले असून, नाशिकच्या उद्योगाचे इस्त्रो साठीचे हे उत्पादन नाशिककरांसाठी अभिमानाची बाब असल्याने उद्योग क्षेत्रातून याबाबत कुतूहल निर्माण झाले आहे मात्र गुप्ततेमुळे उद्योगाचे नाव स्पष्ट होत नाही.

- Advertisement -

तिरुवनंतरपूरम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटर (व्हिएसएससी) करीता बनविण्यात आलेला एरोस्पेस हॉरिझेंटल आटोक्लेव घेऊन तब्बल ७४ चाकांचा हा ट्रेलर गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात नाशिकहून रस्तामार्गे तिरुवनंतपूरमच्या दिशेने निघाला.

७८ टन वजन, ७.५ मीटर उंच आणि ६.६५ मीटर रुंद असा अवाढव्य सिलिंडरच्या आकाराचा हा व्हेसल एअर कार्गो किंवा समुद्र मार्गे नेणे शक्य नसल्याने तो रस्तामार्गेच नेण्याचे ठरले.

एवढे अवजड वजन ओढण्यासाठी पुढच्या बाजूने एक उच्च क्षमतेचा ट्रक जोडण्यात आला होता. त्यातच वाटेमध्ये वाहतूक, विद्युत तारा, अरुंद रस्ते अशी अडथळ्याची शर्यत पूर्ण करतानाच लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे ठिकठिकाणी अडकून पडत होता.

अखेर अकरा त बारा महिन्यांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर अखेर हा ट्रेलर रविवारी दि.१९ जुलै रोजी तो तिरुअनंतपूरम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटरला सुखरुप पोहोचला होता. आता तेथे तो अनलोडिंग करून सेंटरमध्ये प्रस्थापित करण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

या अति विशाल उत्पादना पाठोपाठ येत्या तीन ते चार महिन्यात आणखी एक विशाल काय उत्पादन इस्त्रोसाठी पाठविण्याची तयारी सुरू झाली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे त्यामुळे येणाऱ्या काळात नाशिक औद्योगिक क्षेत्र हे ‘इस्त्रो चे उत्पाद हब’ म्हणून विकसित होऊ लागले असल्याचे चित्र आहे

इस्त्रो सोबत उत्पादना बाबत नाशिकचे उद्योगांनी विकास केलेला आहे इस्त्रो च्या उत्पादनांशी संलग्न असणाऱे काही उद्याेग नाशिक मध्ये आहेत मात्र गुप्तता व सुरक्षिततेच्या कारणामुळे त्यांची नावे व उत्पादनाची माहिती देता येत नाही

– विवेक पाटील. (माजी अध्यक्ष आयमा)

- Advertisment -

ताज्या बातम्या