ट्रकची-आयशरला जोरदार धडक; एकाचा मृत्यू

ट्रकची-आयशरला जोरदार धडक; एकाचा मृत्यू

इगतपुरी | Igatpuri | प्रतिनिधी

मुंबई - आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra Highway) नवीन कसारा घाटात (New Kasara Ghat) एका ट्रकने - आयशर टेम्पोला धडक दिल्याने भीषण अपघात (Accident) घडला आहे. या अपघातात एक ठार तर एक जण जखमी झाला असून अपघातामुळे काहीकाळ कसारा घाटात वाहूतक ठप्प झाली होती...

याबाबत अधिक माहिती अशी की, आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास मुंबई - आग्रा महामार्गावरून मुंबईला (Mumbai) जाणाऱ्या एका ट्रकने (Truck) केळी घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोला (Eicher Tempo) धडक दिली.

यात आयशर टेम्पो थेट एका दरडीवर धडकला, तर ट्रक पलटी झालेला होता. या अपघातात पप्पू यादव (Pappu Yadav) नामक व्यक्तीचा मृत्यू झाला असून शितल यादव (Sheetal Yadav) नामक व्यक्ती गंभीर जखमी आहे.

तसेच या अपघाताची माहिती आपत्ती व्यवस्थापनाला (Disaster Management) कळविल्यानंतर व्यवस्थापनाचे प्रकाश शिंदे आणि त्यांचे इतर सहकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तर अपघात भीषण असल्याने १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला (Ambulance) तात्काळ बोलवून जखमीला रुग्णालयात नेण्यात आले.

दरम्यान, यानंतर पोलिसांनाही (Police) या अपघाताची माहिती देण्यात आली. त्यानंतर घोटी केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांच्यासह इतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आपत्ती व्यवस्थापनाच्या सदस्यांच्या आणि खासगी क्रेनच्या मदतीने मदत कार्य केले. यानंतर आयशर टेम्पोमधील जखमीला बाहेर काढले तर दीड ते दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर चालकाला बाहेर काढण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com