महाराष्ट्रानंतर ‘या’ राज्यात ‘ऑपरेशन लोटस’ चा प्रयत्न; आमदारांना ५० कोटींची ऑफर?

jalgaon-digital
1 Min Read

नवी दिल्ली | New Delhi

महाराष्ट्रात (Maharashtra) ऑपरेशन लोटस यशस्वी झाल्यानंतर आता तेलंगणातही (Telangana) ऑपरेशन लोटसच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. तेलंगणातील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी पक्षांतर करावं यासाठी मध्यस्थी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे…

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगण राष्ट्र समितीच्या (Telangana Rashtra Samithi) चार आमदारांना (MLA)आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुरु होता. त्यानंतर या आमदारांनी स्वत पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी एका फार्महाऊसवर धाड टाकून ही कारवाई केली. या आमदारांपैकी महत्त्वाच्या व्यक्तीला १०० कोटी आणि प्रत्येक आमदाराला ५० कोटींची ऑफर देण्यात आल्याचे समजते.

दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेले तिघे जण खोट्या ओळखीच्या आधारे हैदराबादला (Hyderabad) आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. तसेच या तिघांनी आपण पुजारी, संत आणि व्यावसायिक असल्याचा दावा केला आहे. याशिवाय ज्या आमदारांच्या फार्महाऊसवर कारवाई करण्यात आली, त्यांचा तक्रारदार म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. तसेच या चारही आमदारांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *