Saturday, May 11, 2024
Homeमुख्य बातम्याउड्डाणपुलावर तिहेरी अपघात; एकाचा मृत्यू

उड्डाणपुलावर तिहेरी अपघात; एकाचा मृत्यू

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

उड्डाण पुलावर ( Fly Over ) रस्ता ओलांडताना तीन चारचाकी गाड्यांच्या झालेल्या विचित्र अपघातात ( Accident ) एक पादचारी जागीच ठार झाला तर तिन्ही गाड्यांचे नुकसान झाले.

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आग्रा महामार्गावरील ( Mumbai-Agra Highway )नवीन नाशिक लागत असलेल्या उड्डाण पुलावरून हॉटेल कशीष पॅलेस समोर एक पादचारी रस्ता ओलांडत असतांना समोरून आलेल्या चारचाकी वाहनाची त्याला धडक लागली व त्या पादचाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असतांना चारचाकी स्वाराचे नियंत्रण सुटल्याने त्याने इतर दोघा चारचाकी गाड्यांना जोरदार धडक दिल्याने विचित्र अपघात घडला.

या घटनेची माहिती समजताच अंबड पोलीस ठाण्याचे ( Ambad Police Station ) पथक घटनास्थळी हजर झाले व त्यांनी वाहतूक सुरळीत केली.दरम्यान या अपघातातील मयत पादचारी व्यक्तीची अद्याप ओळख पटली नसून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या