Saturday, April 27, 2024
HomeनाशिकVideo : त्र्यंबकच्या शेंद्रीपाड्यातील 'तो' पूल गेला वाहून; भर पावसात महिलांची पुन्हा...

Video : त्र्यंबकच्या शेंद्रीपाड्यातील ‘तो’ पूल गेला वाहून; भर पावसात महिलांची पुन्हा लाकडी बल्ल्यांवरून कसरत

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गेल्या सहा महिन्यांपूर्वी त्र्यंबक तालुक्यातील शेंद्रीपाडा (Shendripada Tal Trimbakeshwar) या गावात भीषण दुष्काळ (Water Scarcity) होता. येथील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करत खोल दरी एका लाकडावरून ओलांडावी लागत होती. ही बाब तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Aditya Thackeray) यांच्या कानावर जाताच तात्काळ याठिकाणी पुलाची उभारणी करण्यात आली होती….

- Advertisement -

मात्र, यंदाच्या पावसाळ्यात परिसरात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे शेंद्रीपाडा (Shendripada) येथील लोखंडी पूल पुराच्या (Bridge) पाण्यात वाहून गेला आहे. यामुळे येथील महिलांना पुन्हा एकदा लाकडी बल्ल्यांवरून भर पावसात पिण्याच्या पाण्यासाठी ही दरी ओलांडावी लागते आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आज नाशिक दौऱ्यावर असलेले माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) याठिकाणी भेट देणार का? याकडे लक्ष लागून आहे.

अधिक माहिती अशी की, गेल्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचे तालुके अशी ओळख असलेल्या त्र्यंबक, इगतपुरी, सुरगाणा व पेठ परिसरात पाणीटंचाईंचे भीषण वास्तव समोर आले होते. त्र्यंबक तालुक्यातील शेंद्रीपाडा येथील लाकडाच्या बल्ल्यावरून महिलांचा हंडे घेऊन जातानाचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांत प्रचंड व्हायरल झाला होता. व्हायरल झालेल्या व्हिडीओची दखल थेट तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेत तत्काळ याठिकाणी महिलांची जी अडचण होत आहे ती दूर करण्यासाठी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या.

यानंतर युवासेनेच्या कार्यकर्त्यांना (Yuvasena) तात्काळ घटनास्थळी जाऊन लोखंडी पूल उभारला होता. अवघ्या काही दिवसांत याठिकाणी पूल उभारून दिल्यामुळे आदित्य ठाकरे यांचे सर्वदूर कौतुकदेखिल झाले होते. यानंतर थोड्याच दिवसांनी स्वत: आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे या पुलाच्या उद्घाटनासाठी शेंद्रीपाड्यात पोहोचले होते.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात (Nashik District) पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कोरडी होण्याच्या मार्गावर असलेली येथील धरणे अवघ्या काही दिवसांत ओसंडून वाहू लागली आहेत. जिल्ह्यातील आदिवासी बहुल (Tribal area)भागात संततधार आजही सुरूच आहे. शेंद्रीपाड्यातदेखील गेल्या काही दिवसांपासून पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे पुराच्या पाण्यात पाण्यात माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी उद्घाटन केलेला लोखंडी पूल वाहून गेला.

यामुळे येथील महिलांना (Woman) पुन्हा एकदा जीवघेणी कसरत करून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. अगदी थोड्याच दिवसांपूर्वी हा पूल पाण्याखाली गेल्याचे वृत्त आले होते. यानंतर पुराच्या पाण्यात हा पूल वाहून गेल्यामुळे येथील महिलांच्या नशिबी पुन्हा एकदा लाकडी बल्ल्यांवरून पाणी आणणे सुरु झाले आहे. विशेष म्हणजे, खालून पाणी अतिशय वेगाने जात असून या वाहत्या पाण्यात महिला लाकडी बल्लीवरून पाय ठेवून पाणी आणताना या महिला दिसून येत आहेत.

आज आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या शिवसंवाद यात्रेला नाशिकमधून प्रारंभ होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी शिवसेनेला खिंडार पाडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आजपासून शिवसंवाद यात्रेला सुरुवात केली आहे. पर्यावरण मंत्रालयाचा कारभार असताना तत्काळ याठिकाणी नागरिकांची सोय करून देणारे आदित्य ठाकरे आज शेंद्रीपाडा (Shendripada) येथील नागरिकांच्या सोयीसाठी तत्परतेने पुढे येतील का? त्याच्याकडून पुन्हा एकदा युवासेनेच्या कार्यकर्त्यांना याठिकाणची अडचण दूर करण्यासाठी सूचना मिळतील का? याकडे येथील नागरिकांचे लक्ष लागून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या