संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे त्र्यंबकेश्वरमधून प्रस्थान; असा आहे पालखीचा प्रवास

नाशिक | प्रतिनिधी Nashik

संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे (Sant Nivruttinath palakhi) तब्बल दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आज असंख्य वारकऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात प्रस्थान झाले. आज पालखीचा नाशिकमधील सातपूरमध्ये पहिला मुक्काम (nashik satpur) आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पालखीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने वारकऱ्यांचा ओघ त्र्यंबकेश्वरी (Trimbakeshwar) सुरु होता....

मुखी हरिनामाचा गजर, हाती टाळ मृदूंग घेत लाखो वारकरी आषाढी वारीला (Ashadi Wari) पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला (Pandharpur Pandurang Darshan) पायी जात असतात. परंतु करोनामुळे गेली दोन वर्षे विठुरायाचे दर्शन न घेऊ शकलेल्या वारकऱ्यांनी आज मोठ्या भक्तिभावात हा डोळे दिपवणारा क्षण अनुभवला...

आज संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे पंढरपूरकडे (Pandharpur) प्रस्थान झाले आहे. तर आळंदी येथून संत ज्ञानेश्वरांच्या (Sant Dnyaneshwar) पालखीचे प्रस्थान 21 जूनला तर संत तुकारामांच्या (Sant Tukaram Maharaj) पालखीचे प्रस्थान 20 जूनला होणार आहे.

नित्यनेमानुसार, यावर्षीदेखील पालखीचे २६ मुक्काम होणार आहेत. २७ व्या दिवशी पालखी पंढरपुरात पोहोचेल. ०१ जुलैला पालखीचे कर्जत जवळ धांडे वस्ती येथे उभे रिंगण होईल. त्यानंतर 9 जुलै रोजी वाखरी सोहळा संपन्न होणार आहे.

यानंतर याठिकाणी सर्व संतांच्या दिंड्या एकत्र येतील. त्यानंतर पंढरपूर प्रवेश (Pandharpur) सोहळा सुरू होणार होईल. रविवारी 10 जुलै रोजी आषाढी एकादशी यात्रोत्सव असून पालखी मुक्काम आषाढ पौर्णिमेच्या १३ जुलैपर्यंत यात्रा उत्सव आहे. पालखी मुक्काम आषाढ पौर्णिमा 13 जुलैपर्यंत पंढरपुरातच असेल.

असा असेल पालखीचा मार्ग

त्र्यंबकेश्वर-सातपूर-नाशिक-पळसे-लोणारवाडी-खंबाळे-पारेगाव-गोगलगाव-राजुरी-बेलापूर-राहुरी-डोंगरगन-अहमदनगर-साकत-घोगरगाव मिरजगाव-चिंचोली (काळदाते) कर्जत-कोरेगाव, रावगाव-जेऊर-कंदर-दगडी अकोले-करकंब-पांढरीवाडी-चिंचोली-पंढरपूर.

असा असतो प्रवास

दिंडीतील वारकरी दररोज दिवसा वीस किमी पायी प्रवास करत असतात. दिंडी सत्ताविसाव्या दिवशी पंढरपुरात पोहोचेल. यादरम्यान चार मुक्कामानंतर पंढरपूर वारी करून पालखी त्र्यंबकेश्वरकडे माघारी फिरते. 18 दिवसांचा पायी प्रवास करून 30 जुलैला पालखी त्र्यंबकेश्वरमध्ये परत दाखल होईल.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com