
त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar
येत्या महाशिवरात्रीला पर्व स्नान करण्याचा संकल्प येथील साधू महंतांनी केला आहे. त्र्यंबकेश्वरमधील सगळे साधूसंत आणि आखाडा परिषदेचे सदस्य यात सामील होणार असल्याची माहिती श्रीपंचायती निरंजन आखाड्याचे ठाणापती दिगंबर धनंजय गिरी महाराज यांनी दिली....
आनंद आखाड्याचे श्रीमहंत शंकरानंद सरस्वती महाराज, श्रीराम शक्ती पिठाचे महामंडलेश्वर सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या उपस्थितीत याबाबत बैठक झाली. पन्नास पेक्षा जास्त साधूंची या बैठकीला उपस्थिती होती.
महाशिवरात्रीला पहाटे कुशावर्त तीर्थात स्नान करून ज्योतिर्लिंग त्रंबकेश्वर मंदिरात साधू दर्शन घेतील. प्रशासनाची परवानगी मिळवल्यानंतर कार्यक्रमाची पुढील रूपरेषा ठरवली जाणार आहे. त्यामुळे लवकरच आणखी एक बैठक होणार आहे. देशभरातील साधुसंतांनी महाशिवरात्रीनिमित्त पर्वस्नानाला सामील व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.