त्र्यंबकेश्वर : गंगासागर तलावात आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह

त्र्यंबकेश्वर : गंगासागर तलावात आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह

त्र्यंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshwar

त्र्यंबकेश्वर शहरातील संतश्रेष्ठ श्रीनिवृत्ती नाथ मंदिराजवळ असलेल्या गंगासागर तलावात ( Gangasagar Lake )अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

आज दि.21ऑगस्ट रोजी एका 45 ते 50 वर्षे अंदाजे वय असलेल्या अज्ञात महिलेचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आल्याची खबर तेथील सुरक्षा रक्षक पंढरीनाथ पालवे यांनी त्र्यंबकेश्वर पोलिसां ना कळविली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, पोलीस नाईक सचिन गवळी, श्रावण साळवे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

महिलेला जलसमाधी कशी पोलीस तपास करीत आहे पोलीस मित्र विशाल अंडे यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून पंचनामा वगैरे सोपस्कार पूर्ण झाल्यावर मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यास शव विच्छेदन करण्यासाठी जिल्हा रुग्णालय नाशिक येथे पाठवण्यात आले.

त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सचिन गवळी अधिक तपास करत आहेत. तरी देखील सदर महिला कधीपासून पाण्यात पडलेली होती आणि ती कोण आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

दरम्यान त्र्यंबकेश्वर शहरात उपजिल्हा रुग्णालय असूनही येथे शव विच्छेदन गृह नाही. शहर तसेच तालुक्यातून शवविच्छेदन गृहाची मागणी होत असूनही प्रशासन मात्र या बाबीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. त्र्यंबक नगरपरिषदेने शवविच्छेदन गृहासाठी जागा देण्याचा प्रस्ताव मागेच केला असला तरी प्रत्यक्ष जागा आरोग्य विभागाच्या ताब्यात दिलेली नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com