Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक : दुचाकीस्वारांनी लांबविले महिलेचे मंगळसूत्र

नाशिक : दुचाकीस्वारांनी लांबविले महिलेचे मंगळसूत्र

इंदिरानगर | Indiranagar

पाथर्डी परिसरात भाजी घेण्यासाठी गेलेल्या महिलेचे दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र किंमत सुमारे साठ हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना घडली.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पौर्णिमा राजेश पवार (वय 39 रा पांडुरंग चौक, पाथर्डी फाटा ह्या (दि.१०) शनिवारी रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास नरहरी लॉन्स, पाथर्डी फाटा येथून भाजीपाला घेवुन पायी घरी जात होत्या.

यावेळी त्यांच्या समोरून काळया रंगाच्या मोटार सायकलवर आलेल्या दोन इसमांपैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने ओरबाडून पळ काढला.

याप्रकरणी पवार यांनी दिलेल्या फिर्याद नुसार इंदिरानगर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश भामरे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या