Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यादेशाभिमानी उद्योजक गमावला

देशाभिमानी उद्योजक गमावला

मुंबई |प्रतिनिधी Mumbai

राहूल बजाज यांच्या निधनाने Rahul Bajaj passes away भारतीय उद्योगाच्या विकासात केवळ भरीव योगदान देणारा ज्येष्ठ उद्योजकच आपण गमावला नाही तर सामाजिक भान असलेला आणि देशासमोरील समस्यांवर निर्भिडपणे आपली मते मांडणारा, तरुण उद्योजकांचा प्रेरक असा देशाभिमानी उद्योजक आपल्यातून गेला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Chief Minister Uddhav Thackeray यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. बजाज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत.

- Advertisement -

राहूल बजाज यांनी दुचाकी वाहनांच्या Two Wheeler Production उत्पादनात देशात क्रांती आणली तसेच जगातील या क्षेत्रातील इतर कंपन्यांसमोर भारताचे आव्हान उभे केले. त्यांनी केवळ आपल्या उद्योगाचा विकास असा संकुचित विचार केला नाही तर देशातील सर्वच उद्योगांच्या समस्या आणि त्यांना येणाऱ्या अडचणी यावर स्पष्ट तसेच निग्रही भूमिका घेतली, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

एक सच्चा देशभक्त उद्योजक म्हणून देशासमोरील काही समस्यांवर देखील त्यांनी भाष्य केले आणि जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे सामाजिक कार्यही उद्योजकांनी सामाजिक जबाबदारी कशी पार पाडावी त्याचे उत्तम उदाहरण होते. राहूल बजाज हे विशेषत: उद्योजकांच्या युवा पिढीचे मार्गदर्शक होते. त्यांनी राज्य शासनाला देखील उद्योगाच्या विकासासंदर्भात वेळोवेळी महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत.त्यांच्या जाण्याने निश्चितच राज्याच्या उद्योग विश्वाचे नुकसान झाले आहे, असेही उद्धव ठाकरे आपल्या श्रद्धांजलीपर संदेशात म्हटले आहे.

भारतीय उद्योग क्षेत्रातील पितामह हरपला : उपमुख्यमंत्री अजित पवार

Deputy Chief Minister Ajit Pawar

बजाज उद्योग समूहाचे मानद अध्यक्ष, पद्मभूषण राहुल बजाज यांच्या निधनाने सामाजिक भान असलेला भारतीय उद्योग जगतातील पितामह हरपला आहे. बजाज कंपनीच्या माध्यमातून भारताला ऑटो उद्योगात स्वतंत्र ओळख निर्माण करुन देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांचे निधन हे भारतीय सामाजिक, उद्योग क्षेत्राची मोठी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

गेल्या पाच दशकांमध्ये बजाज समूहाला नावारुपाला आणण्यात राहुल बजाज यांनी प्रचंड योगदान दिले. त्यांचा प्रदीर्घ अनुभव, ज्ञान, दूरदृष्टीचा बजाज उद्योगासह भारतीय ऑटो उद्योगाच्या विकासात मोलाचा वाटा राहिला आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात बजाज कंपनीमुळे भारताला स्वतंत्र ओळख मिळाली, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे

सामाजिक आस्था असलेले व्यक्तिमत्त्व हरपले : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

Leader of Opposition in the Legislative Assembly Devendra Fadnavis

प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांच्या निधनाने समाजासाठी प्रचंड आस्था असलेले व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे. ही उद्योग जगताची तर मोठी हानी आहेच, पण एक चांगला समाजसेवक सुद्धा आपण गमावला आहे, अशा शब्दात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राहुल बजाज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

बजाज यांच्या निधनाने उद्योग जगताला मोठा धक्का बसला आहे. स्वतःचा उद्योग मोठा केलाच परंतू इतर उद्योग देखील कसे वाढतील याकडे त्यांनी सतत लक्ष दिले. उद्योगांचा विकास झाल्यास देश संपन्न होईल यासाठी त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. त्यांचे सर्वांशी वैयक्तिक संबंध चांगले होते, पण आवश्यक असेल तेथे सरकारला चार गोष्टी सांगायला ते मागेपुढे बघत नव्हते. शासकीय धोरणात अपेक्षित बदल ते सरकारला मोकळेपणाने सांगत असत. त्यांची उणीव लवकर भरून निघणार नाही.

– देवकिसन सारडा, ज्येष्ठ उद्योजक – Devakisan Sarda, Senior Entrepreneur

आदर्श व्यक्तीमत्व गमावले

उद्योजकांकडे गरजेचे असलेले धाडस हे राहुल बजाज यांच्या कडे होते. ते उद्योजकांसाठीं रोल मॉडेल होते. त्यांना जेव्हा व जे काही वाटले ते बेधडक कोणतेही सरकार असले तरी मुक्तपणे बोलत होते. हे धाडस येण्यासाठी त्यांनी उद्योग उभारणीतून देशसेवेत मोठे योगदान दिले होते. 70 च्या दशकात वाहन उद्योगात मोठी क्रांती करुन त्यांनी जनसामान्यांच्या हाती दूचाकी दिली होती. यात त्यांनी देशाभिमान उंचावण्याचे काम केले हाते. उद्योजकांच्या अंगी असावे असे धाडस त्यांच्या अंगी होते. उद्योजकांसाठी ते आदर्श व्यक्तीमत्व होते. आज हे व्यक्तीमत्व आपण गमावले आहे. त्याचे मोठे दू:ख आहे.

सुधीर मुतालिक- अध्यक्ष सीआयआय महाराष्ट्र Sudhir Mutalik – President CII Maharashtra

उद्योगाला नवे आयाम देणारे व्यक्तीमत्व

बजाज परिवाराने स्वातंत्र्य चळवळीतून देशासाठी उद्योग उभारणीतून पाठबळ उभे केलेले होते. उद्याजकांचे आदर्श असलेले राहल बजाज यांनी देखील मागिल 5 दशकातून भारताच्या उद्योग विश्वाला नवे आयाम दिले आहेत. उद्योग सांभाळतानाच त्यांनी सामाजिक जबाबदारी देखिल पेलेलेली होती. त्यांच्या जाण्याने व्यापार उद्योगांचे आदर्श व्यक्तीमत्व हरपले आहे. उद्योग, व्यापारी व शेतकरी बांधवांच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण आदरांजली.

-हेमंत राठी, माजी अध्यक्ष महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स

-Hemant Rathi, Former President, Maharashtra Chamber of Commerce

- Advertisment -

ताज्या बातम्या